तळमळ एका अडगळीची बालनाट्य नवी मुंबई केंद्रातून प्रथम

नवी मुंबई या नाट्य संस्थेचे नवीन वर्षात पुरस्कार मिळवत दमदार पाऊल

नवी मुंबई: अनेक वर्ष पुरस्कारांची मालिका अबाधित ठेवत शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान, नवी मुंबई या नाट्य संस्थेने या नवीन वर्षातही पुरस्कार मिळवत दमदार पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य
संचालनालय आयोजित १९ वी राज्य बालनाट्य स्पर्धा वाशीतील साहित्य मंदिर सभागृह येथे संपन्न झाली. या स्पर्धेत नवी मुंबई केंद्रातून शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान सेवा संस्था निर्मित तळमळ एका अडगळीची या बालनाट्यास
प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.

सदर स्पर्धेत ठाणे, पनवेल, महाड, वाशिंद, कर्जत, इंदापूर, अलिबाग, रोहा, रायगड आदि ठिकाणाहुन एकूण ३२ नाटकांनी नवी मुंबई केंद्रावर आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्ञानेश्वर गायकवाड, गौरी
लोंढे आणि अभय अंजीकर यांनी काम पाहिले. तळमळ एका अडगळीची या बालनाट्यासाठी प्रशांत निगडे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा  प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. त्याचबरोबर रंगभूषेसाठी अनिल प्रधान यांना देखील प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आणि चार्ली चापलिन पात्र साकारलेल्या प्रियांशू सुतार या बालकलाकाराला अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झाले आहे. असे एकूण चार पुरस्कार या बालनाट्याला प्राप्त झाले.

तळमळ एका अडगळीची बालनाट्याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती प्रशांत निगडे यांनी केली आहे. श्रेया कदम, आयुष वाघ, अर्जुन झेंडे, ईशांत चिमणकारे, दिपेश बाबर, अपूर्व लाड, मानस तोंडवळकर, स्वराज शेळके, ओणम
निकम, ऐश्वर्या काटवते, तेजस्विनी खोपडे, साक्षी खोपडे या बालकलाकारांनीही या नाटकात आपल्या भूमिका चोख बजावल्या. सदरे बालनाट्यासाठी प्रकाशयोजना सुनील मेस्त्री, पार्श्वसंगीत ध्रुव समानी, नेपथ्य प्रशांत निगडे, वेशभूषा विरीशा नाईक तसेच रंगमंच सहायक श्रध्दा शितोळे, ओमकार जाधव, रुपेश जगताप, प्रेम कन्होजीया, स्नेहा वाघ, अशोक कदम या तंत्रज्ञांनी सहकार्य केले.

दरम्‌यान, दिग्दर्शक प्रशांत निगडे दरवेळेस नवोदित कलाकारांना रंगभूमीवर आपले पाऊल ठेवण्यासाठी संधी देत असतात. त्याच कलाकारांना सोबत घेऊन विजयाची परंपरा सातत्याने सुरु ठेवण्याचे शिवधनुष्य प्रशांत निगडे यांनी
उत्तमरित्या पेलवत आले आहेत. २०१३ साली या संस्थेला माकडचाळे या बालनाट्यासाठी महाराष्ट्रातून प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

राष्ट्रीय संमेलनात संपूर्ण भारतातील द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट सेंटर