नेरुळ सेक्टर १ मधील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प  बसवा

नवी मुंबई-:नेरुळ सेक्टर मधील छत्रपती शिवाजी महाराज नावाने चौक आहे. मात्र यात महाराजांचे शिल्प नाही.त्यामुळे या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प बसवावे अशी मागणी काशीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या कडे केली आहे.

एकविसावे शहर म्हणून आज नवी मुंबई शहराची ओळख आहे. त्यामुळे आधुनिक शहराला ऐतिहासिक वारसा  देखील लाभला पाहिजे जेने करून आगामी पिढीला इतिहासाची महती अधिक मिळू शकेल आणि याच उद्देशाने शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिल्प, पुतळे शहरात बसविण्याची गरज आहे. नेरुळ सेक्टर १ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चौक आहे.मात्र या चौकात महाराजांचा ना पुतळा आहे ना कुठली तसवीर आहे.त्यामुळे याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती बसवावी अशी मागणी काशीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २०१६ मध्ये करण्यात आली होती.मात्र त्यावर अजून काही कारवाई न केल्याने 

या ठिकाणी  महाराजांची मुर्ती बसवावी अशी मागणी पुन्हा एकदा काशीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने  अध्यक्ष देवनाथ म्हात्रे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या कडे केली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विजय नाहटा यांचा वाढदिवस साजरा.