सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विजय नाहटा यांचा वाढदिवस साजरा.

नवी मुंबई : शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांचा वाढदिवस नवी मुंबईत  विविध सामाजिक उपक्रम राबवून जल्लोषात साजरा करण्यात आला. तुर्भे नाका येथे कामगार नेते प्रदीप वाघमारे यांच्या माध्यमातून नाका कामगार महिलांना विजय नाहटा यांच्या हस्ते साडीचे वाटप करण्यात आले तसेच इंदिरानगर शाखेत विभाग प्रमुख महेश कोटीवाले यांनी  डोळे तपासणी शिबीर आणि आरोग्य शिबीर आयोजित केले होते. तुर्भेस्टोर येथे विभाग प्रमुख  विनोद मुके यांनी परिसरातील जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट आणि स्वेटरचे मोठ्या प्रमाणात वाटप केले. माजी नगर सेवक सोमनाथ वास्कर आणि तुर्भे नाका विभाग प्रमुख यांनी वाढदिवसानिमित्त क्रिकेट मॅचचे भव्य आयोजन केले होते. उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप घोडेकर यांनी ब्लड डोनेशन शिबीर आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर भारतीय सेलचे जिल्हा संघटक कमलेश वर्मा यांच्या वतीने नागरिकांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले तसेच महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.सानपाडा येथे मिलिंद सूर्यराव यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या ओपन जिमचे विजय नाहटा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिना पासून ते विजय नाहटा  यांच्या वाढदिवसा दरम्यान भगव्या साप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या वाढदिवसा निमित्ताने नवी मुंबईतील विविध भागात मोठया  प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवून भगव्या सप्ताहाची सांगता करण्यात आली. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विजय नाहटा यांनी उपस्थिती नोंदवून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून व त्यांच्या हातून होत असलेल्या जण सेवेचे कौतुक केले. यावेळी जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे,उपजिल्हा प्रकाश पाटील,मिलिंद सूर्यराव,दिलीप घोडेकर, जेष्ठ माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी, शहर प्रमुख विजय माने,प्रवीण म्हात्रे, आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थिती होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवोदित साहित्यिकांकडून उद्याच्या आदर्शवत साहित्याची निर्मिती- रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील