दिवाळे गाव होणार नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज

नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशातील गावांचे स्मार्ट व्हिलेजचे स्वप्न तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजनेच्या अंतर्गत बेलापूर आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले असून नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गावाचा विकास करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने  31 जानेवारी रोजी पाहणी दौरा करण्यात आला. 

यावेळी भाजपा महामंत्री निलेश म्हात्रे, माजी नगरसेविका भारती कोळी, नवी मुंबई महापालिका शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता अजय संखे, विद्युत विभागाचे सुनील लाड, बेलापूर विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती,  संजय पाटील, कैलास गायकवाड, अनंता बोस तसेच असंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

स्मार्ट व्हिलेज अंतर्गत भव्य, सुसज्ज सर्व सुविधांयुक्त मच्छी मार्केट, उद्यान, मासे सुकविण्यासाठी प्लॅटफॉर्म, स्टेज, समाज मंदिर, स्वाध्याय हॉल, प्रसाधनगृहे, लहान मुलांकरिता खेळणी, विरंगुळा केंद्र , गजेबो गार्डन, बहउद्देशीय इमारत, ओपन जिम, चारचाकी वाहनतळ, भाजी व फळ मार्केट तसेच सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याकरिता 15 कोटी रुपये अपेक्षित खर्च करण्यात येणार आहे. याकरिता आमदार निधीची तरतूदही करण्यात येणार आहे. दिवाळे गाव हे स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, चांगले शिक्षण, आरोग्य सुदृढ होण्मियास मदत मिळणार आहे. स्वच्छता व सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रत्येक गाव हे स्मार्ट व्हिलेज तयार करावे, असे स्वप्न साकारले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून सन 2004 सालापासून दिवाळे गाव हे मी दत्तक घेतले असून या गावांमध्ये मी अनेक जेट्टी उभारल्या आहेत. या गावाच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कोटींची तरतूद करण्यात आलेली असून आता हे गाव स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळणार आहेत. स्वच्छता व सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे. दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेज होणार असल्याने  मी सर्वप्रथम स्थानिक ग्रामस्थांचे, आयुक्त अभिजित बांगर व त्यांचे सर्व सहकारी तसेच स्थानिक नगरसेविका भारती कोळी यांचे आभार मानते. दिवाळे गावाला पार्किंगच्या समस्येने वेढले असताना भव्य कार पार्किंगमुळे ट्राफिकची समस्याही सुटणार आहे. दिवाळे गाव हा माझा पायलट प्रोजेक्ट असून त्याच धर्तीवर बेलापूर मतदारसंघातील इतर गावेही स्मार्ट व्हिलेज म्हणून उदयास येणार असल्याचे आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ सेक्टर १ मधील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प  बसवा