ऐरोली-काटई पुलावरील मार्गिकेचे श्रेय उपटण्याचा केविलवाना प्रयत्न ; भाजपाचा आरोप

नवी मुंबई : नवी मुंबईत न केलेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचा शिवसेनेचा केविलवाना प्रयत्न पुन्हा एकदा दिसून आला आहे. खासदार राजन विचारे यांनी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संदीप नाईक आणि आमदार गणेश नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागलेल्या ऐरोली-काटई पुलावरील मार्गिकेचा पाहणीदौरा करून आयत्या बिळावर नागोबा प्रवृत्ती दाखवून दिली आहे, असा पलटवार भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. 

एमएमआरडीएच्या वतीने मुलुंड-ऐरोली-काटई अषा उन्नत पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या पुलाचे बांधकाम सुरू झाले तेव्हां त्यावर नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्यात आली नव्हती. नवी मुंबईतून जाणाÚया या पुलाचा नवी मुंबईकरांना काहीच उपयोग होणार नसल्याने  संदीप नाईक यांनी एमएमआरडीएकडे या पुलावर मुंबईच्या आणि डोंबिवलीच्या दिषेने नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्याची मागणी केली. 2017 पासून त्यांनी अविरतपणे या मार्गिकेसाठी पाठपुरावा केला आहे. एमएमआरडीएचे माजी आयुक्त युपीएस मदान, त्यानंतरचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून त्यांना या मार्गिकेच्या उभारणीसाठी निवेदने दिली.  विधीमंडळाच्या अधिवेषनात तारांकीत प्रष्न, लक्षवेधी चर्चा, पुरवणी मागण्यांवरील चर्चा या माध्यमातून ही मार्गिका बांधण्याची मागणी षासनाकडे केली. 

विद्यमान आमदार  गणेश नाईक यांनी देखील या मार्गिकेसाठी अधिवेषनादरम्यान विधानसभेत आक्रमकपणे मागणी केली. या उडडाणपूलाचा पाहणीदौरा करून एमएमआरडीएकडे नवी मुंबईकरांसाठी मार्गिका बांधण्याच्या मागणीसाठी इषारा दिला होता. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर डिसेंबर 2021मध्ये झालेल्या बैठकीत 15 जानेवारी 2022 पर्यंत जर या मार्गिकेबाबत ठोस कार्यवाही झाली नाही तर या उडडाणपूलाचे बांधकाम बंद पाडू, असा निर्वाणीचा इषारा दिला होता. या इषाÚयानंतर पालिका प्रषासन हडबडले. एमएमआरडीए प्रषासनाबरोबर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतलेल्या बैठकांमधून ऐरोली काटई पुलावर नवी मुंबईसाठी मार्गिका ठेवण्याची भुमिका मांडली. लोकनेते आमदार नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार या पुलाचा नवी मुंबईकरांना उपयोग होईल यासाठी मार्गिका बांधण्याचे ठरले आहे.

नवी मुंबईत शिवसेनेने न केलेल्या विकास कामांचे श्रेय उपटण्याचा जणू सपाटाच लावला आहे.  आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्षनाखाली नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून उभे राहणारे ऐरोलीचे नाटयगृह असो की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असो, दुबार उदघाटनं करून आपलं हसं करून घेतलं आहे. नवी मंुबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून हे सर्व प्रकार चालले आहेत. हे नवी मुंबईकर जनता चांगल्या प्रकारे जाणून आहे. नवी मुंबईत शिवसेनेच्या मंत्री, खासदारांना आपण यांना पाहिलंत का? असा प्रश्न विचारत शोधावे लागत होते ती मंडळी पालिका निवडणुकीच्या अगोदर प्रगटू लागले आहेत. मात्र नवी मुंबईकरांच्या भल्याची काळजी आतापर्यंत कुणी वाहिलेली आहे, हे नवी मुंबईकरांना माहित आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या स्टंटबाजीला नवी मुंबईकर भिक घालणार नाहीत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केगाव येथे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन