एपीएमसी वाहतूक पोलिसांचा कारवाईत दुजाभाव ?
नवी मुंबई-: कोपरी गाव पाम बिच मार्गावर नो पार्कींग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र नो पार्किंग झोन असून देखील या ठिकाणी वाहन विक्रेते वाहने विक्रीसाठी उभी केली जातात. मात्र या उभ्या असलेल्या वाहनांकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत इतर वाहनांवर कारवाई करत असतात.त्यामुळे वाहतूक विभागाच्या करवाई दुजाभाव होत असल्याचा आरोप आता नागरिक करू लागले आहेत.
नवी मुंबई शहरातील बेशिस्त वाहन पार्किंग ला चाप बसावा म्हणून वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरत अति वर्दळीच्या रस्त्यावर नो पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत
आणि या नो पार्किंग झोन मध्ये वाहन पार्क केल्यास त्यावर वाहतुक पोलिसांकडून कारवाई केली जाते. अशाच प्रकारे पाम बिच मार्गावर कोपरी गाव पासून अरेंजा कॉर्नर पर्यंतच्या रस्त्यावर नो पार्किग झोन तयार करण्यात आहे.मात्र या ठिकाणी नो पार्किंन झोन असून देखील येथील वाहन विक्रते ,वाहन सजावट व्यसायिक सर्रास पणे रस्त्याचा व्यवसायिक वापर करत नो पार्किंग झोन मध्ये वाहने उभी करत असतात. आणि या वाहन विक्रेत्यांना एपीएमसी वाहतूक शाखेचा विशेष आशीर्वाद असल्याने या ठिकाणी तुरळक करवाई केली जाते.
मात्र या वाहनांसमोरच एपीएमसी वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावरन जाणाऱ्या इतर वाहनांवर वाहतूक नियम तोडले म्हणून कारवाई करत असतात.त्यामुळे एकाच रस्त्यावर एकाच ठिकाणी कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडून दुजाभाव केला जात असल्याने वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे.