महापालिका निवडणुक प्रभाग रचना मंगळवारी होणार सादर
नवी मुंबई -: नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेचे प्रारुप आराखडे मंगळवारी सादर होणार आहेत.येत्या एप्रिल महिण्यात महापालिका निवडणूका होण्याची शक्यता असल्याने या प्रभाग राकनेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.मात्र सदर प्रभाग रचेनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप भाजप कडुन आधीच करण्यात आला असून याबाबत राज्यपालांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.त्यामुळे प्रभाग रचना जाहीर होताच निवडणुकी आधीच राजकीय शिमगा नवी मुंबईत पहावयास मिळणार आहे.
एप्रिल २०२० मध्ये नवी मुंबई महापालिका निवडणुक होणार होती.आणि त्यासाठी प्रभाग आरक्षण देखील पाडण्यात आले होते.मात्र निवडणूकीची आचारसंहिता लागण्याआधिच कोविड महामारीमुळे निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यानंतर आता एप्रिल २०२२ मध्ये ही निवडणूक घेण्याचे संकेत मिळत आहेत.आधी १११ प्रभागात एकल सदस्यीय पद्धतीने होणारी ही निवडणूक आता बहुसदस्यीय पद्धतीने होणार असून आता ११ प्रभाग वाढल्याने १२२ प्रभाग तयार करण्यात आले आहेत.त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार आहेत्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे महापालिकेने कच्चा प्रभाग आराखडे सादर केले होते.त्यास मंजुरी मिळाली असून आता मंगळवारी प्रारूप आराखडे सादर होणार आहेत.परंतु प्रभाग रचनेचे जे नियम आणि निकष आहेत ते डावलून महा विकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना फायदा होईल यासाठी अनुकूल अशी प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने आधीच करण्यात आला आहे. याबाबतचे तक्रारीचे निवेदन दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजी ऐरोली विधानसभेचे माजी आमदार संदीप नाईक यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना दिले आहे.त्यामुळे मंगळवारी प्रभाग रचना जाहीर होताच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार असून भाजप काय भूमिका घेते या कडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील. मात्र प्रभाग रचना जाहिर होणार असल्याने मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली निवडणूक होण्याची शक्यता वाढली आहे.त्यामुळे या प्रभाग रचनेकेडे इच्छुक उमेद्वारांसह नवी मुंबई करांच्या नजरा लागलेल्या असतील.
परिमंडळ २ च्या कार्यालयात माजी नगरसेवकांच्या घिरट्या ?
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग आराखडा मंगळवारी जाहीर होणार आहे. मात्र सदर प्रारूप आराखड्याचे दर्शन आधीच काही राजकीय नेत्यांनी घेतले होते का?अस सवाल उपस्थित होत आहे.कारण मागील दोन आठवड्यापासून मनपा निवडणूक अधिकारी व परिमंडळ २ चे उपायुक्त यांच्या दालनाबाहेर राजकीय नेत्यांच्या घिरट्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.त्यात महाविकास आघाडीतील माजी नगरसेवक आघाडीवर होते.त्यामुळे माजी आमदार संदिप नाईक यांनी प्रभाग आरक्षणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला होता. तो आरोप खरा आहे का?असा सवाल देखील उलस्थित होत आहे.