समाजकार्यासाठी युवकांनी नेहमी पुढे यावे - प्रा अमोलकुमार वाघमारे
राबाडा : समाज कार्य करण्यासाठी समाजातील लोकांनी आता पुढे येण्याची गरज आहे आणि रंजलेल्या गंजलेल्या गरजवंत लोकांना मदतीचा हात देण्यासाठी सदैव तत्पर राहणे ही काळाची गरज बनली आहे असे मत रबाळे अंनिस चे कार्याध्यक्ष प्रा अमोलकुमार वाघमारे यांनी व्यक्त केले रबाळे नवी मुंबई येथील युवकांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक नवा आदर्श निर्माण केला आहे बिग फ्रेंड सर्कल नवी मुंबई व आमची दुनियादारी टीम नवी मुंबई यांच्यामार्फत एक अनोखा आणि समाजाला हेवा वाटावा असा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
याबाबत माहिती अशी की भारताचा प्रजासत्ताक दिन खूप मोठ्या उत्साहात देशभर साजरा केला जातो, या उत्साहात देश असताना रबाळे मधील शाहू महाराज विद्यालय चे माजी विद्यार्थी युवकानी प्रिश्चिला अनाथाश्रम दिघा नवी मुंबई येथे जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व खाद्य पदार्थ देवून मुलामध्ये मिळून मिसळून प्रेरणा जागृत करून आनंद , उत्साह व देशप्रेमाचे दर्शन दिले. असा आदर्श उपक्रम राबवित समाजासमोर आदर्श ठेवण्याच काम केल्याने युवकांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
यामध्ये सातत्याने सलग चार वर्ष या युवकांनी हे कार्य केलेलं आहे व यापुढेही असेच समाजोपयोगी कार्य करीत राहू असे मत या युवकांनी व्यक्त केले
यावेळी बोलताना प्रा अमोलकुमार वाघमारे सर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मूलमंत्र देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीच्या विचाराचा आणि स्वातंत्र्य समता न्याय बंधुता वादी संविधानाचा अभिमान वाटत असल्याचे भावना व्यक्त केले.यामध्ये युवा उद्योजक श्री जितेंद्र माशाळकर यांनी आधुनिक सिंधुताई म्हणून आश्रमाच्या संचालिका जेरूषा मॅडम यांचा सन्मान केला.श्री दिलीप निंबारा सर यांनी जेरुषा मॅडम यांना चंदनासारखे झिजून अनाथ मुलांना शिकवणाऱ्या मायमाऊली असा उल्लेख केला. श्री रविकांत शिवशरण सर यांनी या मॅडम चे कार्य पाहून अश्रू अनावर होत असल्याचे मत व्यक्त केले, यावेळी * बिग फ्रेंड सर्कल चे अध्यक्ष राजू संगनोरे* यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेछा दिल्या. यावेळी सचिव सूरज धसाडे, जयदेव कदम,नसीरुद्दीन शाह, मनोज पवार,प्रशांत बल्लारे,फिरोज शेख यांच्यासह बिग फ्रेंड सर्कल चे सर्व सदस्य उपस्थित होते
या युवकांचे हे समाजपयोगी कार्य पाहून समाजातून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे आणि इतरांनी ही सढळ हाताने मदत करून प्रेरणा घेण्याचे आवाहन या युवकांनी केले आहे. शेवटी आभार प्रदर्शन सुरज धसाडे यांनी केले