ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन
शालेय शुल्क सवलतीबाबतचा अहवाल सादर करा
नवी मुंबई-: कोविड काळात शाळांनी शालेय शुल्कात १५% सूट द्यावी असे आदेश राज्य शिक्षण विभागामे काढले होते. त्यानुसार मनपा शिक्षण विभागामार्फत शहरारील शाळांना अवगत केले होते.आणि यावर शाळांनी काय कारवाई केली आहे याचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व शाळांना मनपा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कोवीड महामारीत लागललेल्या लॉकडाऊन मध्ये सर्व रोजगार बंद असताना शाळा देखील बजड ठेवण्यात अळून होत्या.व ऑनलाईन शिक्षण सुऊ ठेवण्यात आले होते. मात्र रोजगार बंद असल्याने शालेय फी मध्ये सूट मिळावी म्हणून पालकांनी व ओआलक संघटनांनी मगणी केली होती.यावर सर्व शाळांनी शकी फी मध्ये १५% सूट द्यावी असे आदेश राज्य शिक्षणमंत्री यांनी १२ अाॅगस्ट २०२१ ला काढले होते. यांची अंमलबाजवणी करण्याच्या सुचना स्थानिक शिक्षण विभागला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मनपा शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांना आदेश पारित केले होते. त्यानुसार सण २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शालेय फी मध्ये १५% सूट देण्याबाबत काय केले आहे याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा शिक्षण अधिकारी जयदीप पवार यांनी सर्व शाळांना दिले आहेत.