महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
वाशी मध्ये महिला बचत गटासाठी उद्योग व्यवसाय आणि कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभाग, खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि नॅशनल फिशवकर्स वेलफेअर फेडरेशनच्या वतीने वतीने गुरुवार ता. 20 जानेवारी रोजी बचत गटातील महिला सदस्यासाठी उद्योग व्यवसाय आणि कौशल्य प्रशिक्षण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खादी आणि ग्रामोद्योग आयोग कडून महिलांना उद्योग व्यवसाय तर टाटा स्ट्राईव्ह या संस्थेच्या वतीने व्यवसाय प्रशिक्षण आणि रोजगार या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर प्रशिक्षण हे परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या बेलापूर, नेरुळ, तुर्भे आणि वाशी कोपरखैरणे विभागात कार्यरत असलेल्या महिला बचत गटातील सदस्यांसाठी आहे. प्रशिक्षणाची वेळ दुपारी साडे बारा ते साडे तीन अशी असून सदर कार्यशाळा शासनाच्या कोरोना नियमाचे पालन करून घेण्यात येणार आहे. बचत गटातील पदाधिकाऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी बेलापूर विभाग - मोहन गायकवाड - 8652441101 ,नेरुळ विभाग प्रियंका पाटील - 9082311440, हेमंत परते - 95 45 362568 तुर्भे विभाग स्वप्नाली मढवी - 90 82 544474 वाशी विभाग अनुपमा आरकडे - 8655590465