महालिंगेश्वर मंदिर, पुत्तुर, दक्षिण कन्नडा

पुत्तूरमधील सर्वात लोकप्रिय अध्यात्मिक ठिकाणांपैकी एक, महालिंगेश्वर मंदिर ११व्या-१२व्या शतकाच्या आसपास बांधले गेले असे मानले जाते. मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि मंदिराच्या परिसरात एक लहान तलाव आहे.

बेंद्रु तीर्थ...
पुत्तूरमध्ये बेंद्रू तीर्थाला भेट आवर्जून द्यावी असे हे स्थळ आहे. सीरेसुडे नदीजवळील गरम पाण्याचा झरा म्हणजे बेंद्रू तीर्थ. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने दक्षिण भारतातील एकमेव नैसर्गिक उष्ण झरा म्हणून सूचीबद्ध केलेल्या, झऱ्याच्या पाण्यात गंधक असते आणि त्यात औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते.
पाण्याचे तापमान सामान्यतः कायम ९९ डिग्री फॅ. आणि १०६ डिग्री फॅ.दरम्यान राहते.

जनार्दन मंदिर...
पुत्तूर तलावाच्या काठावर आणि एका लहान विहिरीवर स्थित, जनार्दन मंदिर हे एक शांत आणि प्रसन्न आध्यात्मिक ठिकाण आहे जे पल्लव राजवटीच्या काळात बांधले गेले होते. हे मंदिर ३५०० वर्षांहून अधिक जुने आहे शिल्पकलेने समृद्ध आहे आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या जनार्दनाला समर्पित आहे.येथील विहिरीतील पाण्याचा उगम काशीतून होतो असे मानले जाते. - सौ. संध्या यादवाडकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वर्षानंतर आईला आठवताना...