उन्हाळ्यातील अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस बरसला चोहीकडे
वाहू लागले जोराने वारे
शेतकऱ्यावर संकट आले
नुकसान फार झाले हाताशी आलेल्या पिकांचे
उकाड्याने हैराण झालेल्यांना देई क्षणभर
दिलासा वातावरणातील गारवा

सध्या महाराष्ट्रात सगळीकडे अवकाळी पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले दिसते. साधारण मागच्या दशकापासून ग्रीष्म ऋतुमध्ये (मे महिन्यात) कडक उन्हाळा असूनही बऱ्याच ठिकाणी वातावरण कुंद होऊन पावसाच्या सरीवर सरी पडू लागल्या आहे. मात्र अंदाजे तीन ते साडेतीन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाचा उल्लेख आढळून आला आहे. याचाच अर्थ प्राचीन काळापासून ग्रीष्म ऋतुमध्ये सुध्दा पाऊस पडत असावा.

ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात पाऊस पडतो त्यातही ज्या ठिकाणी क्वचित हवेतला उष्मा प्रचंड प्रमाणात वाढतो. सहसा त्या दिवशी त्यातही सायंकाळी हलका तर काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता असते. तापमानातील या फरकामुळे अनेकजण आजारी पडतात. तसेच ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते त्यांना या अवकाळी पडणाऱ्या पावसाचा खूपच त्रास होतो.

वास्तवात आयुर्वेदानुसार जो ऋतू सुरु आहे त्या ऐवजी भलत्याच ऋतुची लक्षणे दिसणे हा तर काळाचा मिश्या योग म्हटला जातो. मिश्या म्हणजे चूक अर्थात ग्रीष्म ऋतुत पावसाची अपेक्षा नसून उन्हाळ्याची असते अशा वेळी पाऊस पडल्याने ती काळाची चूक असून आरोग्यास हानिकारक ठरते. आणि रोगांना आमंत्रण देणारी ठरते, असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे.

काळ या घटकाचा सृष्टीवर व शरीरावर होणारा प्रभाव लक्षात घेता काळाचे ‘अति-हीन-मिश्या' असे तीन प्रकार सांगितले जातात. उन्हाळ्यात अतिप्रचंड प्रमाणात येणारा कडक उन्हाळा म्हणजे अतियोग, उन्हाळा असूनही क्वचित पडणारे ऊन व त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता - उष्मा न जाणवणे हा झाला हीनयोग आणि अपेक्षित ऋतूच्या विपरीत ऋतू लक्षणे दिसणे म्हणजे मिश्यायोग होय. अति-हीन-मिश्या हे काळाचे तीनही प्रकार निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करतात, असे निश्चित मत प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा काळात संसर्गजन्य आजार सर्वत्र फैलावण्याचे प्रमाण वाढते अशी सूचनाही पूर्वज देऊन गेले आहे.

उन्हाळ्यात वातावरण थंड होणे किंवा पाऊस पडणे हा झाला मिश्या योग. यामधील उन्हाळ्याचा पाऊस हा सध्या आपल्याला अनुभवास येत आहे. जो आरोग्यास बिलकूल पूरक नाही. असा अवकाळी पडलेला पाऊस हा वातावरणात अचानकपणे बदल घडवून विषाणूजन्य संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरतात. तसेच हा अवकाळी पाऊस शेतमालाचे नुकसान करुन शेतकऱ्यांना धोकादायक ठरतो.

ग्रीष्मातल्या पावसाचे पाणी पिण्यास अनुकूल असते. हा मिश्या योग असला तरी आणि सभोवतालचे वातावरण बिघडले असले तरी प्रत्यक्षात या पावसाच्या पाण्याच्या गुणांबद्दल सांगताना मात्र चरक संहितेने म्हटले आहे की, ग्रीष्म ऋतुतील पावसाचे पाणी हे अभिष्ट्यन्दी याचा एक अर्थ असा की या पाण्यामध्ये बुळबुळीतपणाचा दोष नसतो आणि ते पाणी शरीरामध्ये कफाचा चिकटपणा वाढू देत नाही. याशिवाय अभिष्ट्यन्दी याचा अर्थ त्वरीत रोग निर्माण करण्याजोगी अवस्था आणि त्याच्या विरोधी ते मथितार्थाने ते ग्रीष्मातल्या पावसाचे पाणी दोष या रोग निर्माण करीत नाही. - लीना बल्लाळ 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

प्रौढ होणाऱ्या मुलास, बापाचे अनावृत्त पत्र