महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अक्षता म्हात्रे प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी
नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ जुलै २०२४ रोजी दिल्लीतून अक्षता म्हात्रे अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी. सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याबाबत ठाणे, नवी मुंबई आयुक्त आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. परंतु, मधल्या काळात विशेष सरकारी वकिलांची अधिकृत नियुक्ती केल्याचे लेखी आदेश विशेष सरकारी वकील यांना प्राप्त झाले आहेत की नाहीत? सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार की नाही? याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे अक्षताच्या माहेरचे आगास्कर कुटुंबिय आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याची दखल घेऊन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी त्याअनुषंगाने लवकरात लवकर कार्यवाही करुन विशेष सरकारी वकिलांची नेमणूक आणि सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे अधिकृत लेखी आदेश गृह विभागाने त्वरीत पारित करावे, अशा मागणीचे पत्र गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. तसेच त्याबाबतीत पुढील कारवाई करण्याची विनंती फडणवीस यांना केली.
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी देखील आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांचे यांच्या मागणीची त्वरित दखल घेऊन त्याबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत सदरचे पत्र संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले. तसेच पोलीस तपासात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये अशा सूचनाही संबंधितांना दिल्या आत. त्यामुळे आता आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा होऊन कै. अक्षता म्हात्रे हिला लवकरात लवकर न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.