महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नवी मुंबईत ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील दोघे अटकेत
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने नेरूळच्या शिरवणे एम आय डी सी तील एका हॉटेलवर छापा मारून नवी मुंबई परिसरात ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली आहे. तसेच या रॅकेट मधील दलालांनी वेश्याव्यवसायासाठी शिरवणे येथील एका घरामध्ये डांबुन ठेवलेल्या ८ महिलांची सुटका देखील केली आहे. मागील काही महिन्यांपासून सदर ऑनलाईन सेक्स रॅकेट सुरु असल्याचे तपासात आढळून आले आहे.
नवी मुंबई परिसरातील ऑनलाईन सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या टोळीने तयार केलेल्या ऑनलाईन साईटवर संपर्क साधला असता, सदर टोळीने बनावट ग्राहकाला शिरवणे एमआयडीसीतील हॉटेल रिव्हर पार्क मध्ये बोलावून घेतले. त्यानुसार बनावट ग्राहकाला त्याठिकाणी पाठवून देण्यात आले. त्यानंतर एएचटीयु च्या पथकाने हॉटेल रिव्हर पार्कमध्ये छापा टाकला असता, सदर ठिकाणी वेश्यागमनासाठी एक महिला आल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिला विष्णु ऊर्फ विकासकुमार यादव याने वेश्यागमनासाठी पाठवल्याचे सांगितले. तसेच तिच्या प्रमाणेच इतर महिला व मुलीना शंभु उपाध्याय यांने शिरवणे गावातील सृष्ठी बिल्डींगमधील रूम मध्ये ठेवले आल्याचे सांगितले. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने त्याठिकाणी छापा टाकुन ७ महिलाची सुटका केली. तसेच त्याठिकाणी मॅनेजर म्हणुन कामाला असलेल्या विष्णु ऊर्फ विकासकुमार जानकी यादव (28) व इंद्रजीत इंद्रदेव प्रसाद,(63) या दोघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली. पोलिसांनी आता ऑनलाईन साईट चालवणारा मोबाईल धारक तसेच महिलाना वेश्याव्यवसायासाठी प्राप्त करणारा दलाल शंभु उपाध्याय यांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या टोळीने ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवण्यासाठी ऑनलाईन साईटवर व्हॉट्सऍप लिंक असलेले मोबाईल फोन नंबर दिले होते. सदर मोबाईल फोनवर एखाद्या ग्राहकाने संपर्क साधल्यास सदर मोबाईल वरून ग्राहकासोबत चॅटिंग करून नवी मुंबई परिसरात लॉज बुक करण्यात अथवा गि-हाईकास लॉजमध्ये रूम बुक करावयास लावले जात होते. अथवा गि-हाईकाच्या सोई नुसार शॉर्ट टाईम साठी 5 हजार रुपये वेश्यागमनाचा मोबदला घेवुन गि-हाईकास मुली पुरविले जात होते. ग्राहकाने मुलीकडे किंवा हॉटेल मॅनेजरकडे पैसे जमा केल्यानंतर त्यापैकी काही पैसे मुलीला, लॉज मॅनेजरला, रिक्षावाल्यास, महिला/मुली पुरवणा-या छोटुला तसेच ऑनलाईन साईट चालवणा-या व्यक्तीला व उर्वरित पैसे दलाला दिले जात होते.