महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
सिमकार्ड कार्डचा पर्दाफाश
बनावट सिमकार्डचा वापर करुन फसवणूक करणाऱ्या टोळीतील त्रिकुट जेरबंद
ठाणे ः विविध मोबाईल कंपनीच्या सिमविक्री करणाऱ्या एजंटच्या मध्यातून दुसऱ्याच्या नावावरील सिमकार्डचा परराज्यात, विदेशात वापर करुन बनावट शेअर ट्रेडिंग ॲप्लिकेशन द्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळण्यात ठाणे पोलिसांच्या सायबर शाखेला मोठे यश लाभले आहे. या कारवाईत सिमकार्डचा वापर करीत परराज्यातून आणि विदेशातून गोरखधंदा चालवीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सायबर, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
चितळसर पोलीस ठाण्यामध्ये दाखल दाखल गुन्ह्यात अज्ञात आरोपींनी मोबाईलवर तक्रारदार यांना एक लिंक पाठवून शेअर गुंतवणुकीत चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. यानंतर सायबर टोळीने त्यांना २९.३० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात सिमकार्ड कांडचा पर्दाफाश झाला. तपासात सायब गुन्हेगारांचा मोबाईल क्रमांक ज्या इन्सेटमध्ये वापरात आला, त्याच्या आयएमईआयचे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. सदर मोबाईल हँडसेट सद्यस्थितीत न्यू शांतीनगर, जिल्हा रायपूर-छत्तीसगड येथे वापरात असल्याचे निष्पन्न झाले.
अज्ञात आरोपींची कोणतीही स्पष्ट ओळख निष्पन्न होत नसताना केवळ आयएमईआय लोकेशन ट्रेस करुन तांत्रिक ज्ञानाचा वापर करुन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगलसिंग चक्षाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष साळवी, सायबर सेलच पोलीस नाईक प्रविण इंगळे, राजेंद्र नेगी, गणेश इलग यांंनी आरोपींचे गुन्हेगारी स्थळ शोधून १६ जुलै रोजी छत्तीसगड येथे यशस्वी कारवाई केली. या कारवाईत आरोपी अफताय इरशाद देबर (२२) रा. जगदलपूर, मनिषकुमार मोहित देशमुख (२७) रा. पुरानी बस्ती आणि टोळ्यांना सिमकार्ड पुरविणारा भाईजान उर्भ हाफीज लईक अहमद (४८) रा. उत्तर पूर्व-दिल्ली पाला या तिघांना जेरबंद केले. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
हस्तगत डेब्रीट-क्रेडीट कार्डद्वारे ५-६ बँक खाते उघड...
न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावल्यानंतर पोलीस पथकाने केलेल्या चौकशीत आरोपींच्या ताब्यातून डिएक्टीव्हेट ७७९ मोबाईल सिमकार्ड, १ लॅपटॉप, २ वायफाय राऊटर, २३ मोबाईल हॅन्डसेटस्, ५० डेबीट-क्रेडीट कार्ड, २० चेक बुक, पासबुक, रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यानंतर जप्त मोबाईल सिमकार्ड, बँक चेकबुक, डेबीट कार्ड आणि क्रेडीटकार्ड संबंंधित बँक खात्यांचे विश्लेषणात्मक तपास केला असता सुमारे ५ ते ६ बँक खात्यांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आणि मोडपा स्वरुपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.
विविध राज्यात १४ फसवणुकीच्या तक्रारी...
पोलिसांनी केलेल्या छापेमारीत हस्तगत केलेल्या सिमकार्ड मधून अनेक बँकांशी व्यवहार झाल्याचे समोर आले. तर दुसरीकडे राजस्थान, हरियाणा, आंध ्रप्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, केरळ, आदि राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये १४ तक्रारी दाखल असल्याचे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवरील अभिलेखावर नमूद असल्याचे सायबर-आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले. या टोळीत इतर आरोपींचाही समावेश असल्याचा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने पोलीस अधिक तपास करीत आहोत, असेही पोलीस उपायुवत मणेरे म्हणाले.
सिमकार्डाचा राज्यात, विदेशात वापर...
ठाणे गुन्हे शाखा आर्थिक सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सिमकार्ड कांड करुन आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे येत्या काळात अशा प्रकारचे गुन्ह्यांवर अंकुश बसणार आहे. आरोपींनी हस्तगत केलेल्या सिमकार्ड व्यतिरिक्त रायपूर, विलासपूर आणि दिल्ली या राज्यातून इतर सिमकार्डचा गुन्ह्यांसाठी वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या आरोपींनी सायबर गुन्ह्यांसाठी विदेशात कंबोडिया, दुबई, चीन आणि इतर देशात सिमकार्डचा वापर केला असल्याचे तपासात दिसून येत आहे. दुसरीकडे यापूर्वी एकूण ३००० सिमकार्ड अशा फसवुणकीच्या गुन्ह्यांंमध्ये वापरली असल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती उपायुक्त मणेरे यांनी दिली.
सायबर गुन्हेगार २ प्रकारे गुन्हे करतात. विविध आयडिया लावून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, तुमचे पार्सल आले, लिंक पाठविणे अशा प्रकारे घाबरवून फसवणूक करणे तर दुसरे नपयाचे आमिष दाखवून फसविण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे नागरिकांनी अशा कुठल्याही अमिषाला बळी पडू नये. अनोळखी लिंक क्लिक करु नये. आपले ओटीपी कुणालाही शेअर करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. -पराग मणेरे, पोलीस उपायुक्त-सायबर, आर्थिक गुन्हेशाखा, ठाणे.