अक्षता म्हात्रे हिला न्याय द्या; नराधमांना फाशी द्या!

नवी मुंबई : शीळ फाटा येथील घोळ गणपती मंदिर क्षेत्री स्वतःला पुजारी म्हणवणाऱ्यांनी आध्यात्मिक आणि सामाजिक कर्तव्य निभावण्याऐवजी चहाद्वारे असहाय्य विवाहितेला बेशुध्द करतात आणि नंतर या विवाहितेची अब्रू सर्व नराधम लुटतात. अन्‌ जेव्हा  शुध्दीवर आल्यावर विवाहितेने प्रतिकार करताच तिचे डोके दगडावर आपटून, तिचा गळा दाबून हत्या करतात आणि डोंगरावरुन तिचा मृतदेह खाली फेकून देतात, ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना ९ जुलै रोजी घडली आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर नवी मुंबईत सर्वत्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून याबाबत नवी मुंबईकरांमध्ये प्रचंड रोष आहे.

मुळची कोपरखैरणे गांवची सुकन्या आणि बेलापूर गांवची सुनबाई असलेल्या अक्षता कुणाल म्हात्रे या विवाहितेसोबत झालेल्या सदर घटनेचा निषेध नोंदवितानाच या प्रकरणातील अत्याचारी नराधमांना फाशी द्यावी या मागणीसाठी १६ जुलै रोजी वाशी गावातील स्व. प्रेमनाथ पाटील चौकात शेकडो नागरिक एकत्र आले होते.

या अमानुष घटनेतील नराधमांना कायद्याने जी काही कठोर शिक्षा व्हायची तो होईलच; पण घटनेचे स्वरुप आणि गांभीर्य बघता आरोपींना फाशीची शिक्षा योग्य असल्याची भावना यावेळी निषेध करणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांची होती. या निषेध आंदोलनाप्रसंगी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत, निशांत भगत, संदीप भगत, पिडीत विवाहितेचे नातेवाईक तसेच वाशी गावातील महिला, तरुण आणि ग्रामस्थ-नागरिक उपस्थित होते. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 सिमकार्ड कार्डचा पर्दाफाश