पामबीच मार्गावर भीषण अपघात

वाशी: बेलापूर-वाशी दरम्यानच्या पामबीच मार्गावर बेलापूर येथून वाशी दिशेने जाणाऱ्या होंडा सिटी कारचा सानपाडा जवळ मोराज सर्कल येथे भीषण अपघात झाला. या अपघातात अतिवेगामुळे  वाहन चालकाचे होंडा सिटी कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून एका झाडावर आदळली.

नवी मुंबई शहरातील ‘ववीन नेकलेस' (राणी हार) म्हणून प्रसिध्द असलेला पामबीच मार्ग भरधाव वेगासाठी देखील ओळखला जातो. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या अपघातात लक्षणीय वाढ होत चालली आहे.१९ एप्रिल रोजी देखील पामबीच मार्गावर होंडा सिटी कारचा अपघात घडला आहे.

बेलापूर येथून वाशीकडे एक होंडा सिटी कार पामबीच मार्गावरुन भरधाव वेगाने चालली होती. मात्र, चालकाचे होंडा सिटी कारवरील नियंत्रण सुटल्याने सानपाडा येथे मोराज सर्कल जवळ होंडा सिटी कार दुभाजकाला धडकून एका झाडावर आदळली. या भीषण अपघातात कारच्या धडकेने रस्ता दुभाजकातील संपूर्ण झाड कोसळले असून, होंडा सिटी कारचा अक्षरशः चेंदा मेंदा होऊन कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात जखमी झालेला वाहन चालक अखिल पिल्लाई याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे पामबीच मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पामबीच मार्गावरील वाहतुक सुरळीत केली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई पोलिसांची अंमली पदार्थाच्या तस्कारांविरोधात धडक कारवाई