कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉवटरांअभावी रुग्णांची गैरसोय

उरण : ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी इंदिरा गांधी रुग्णालयानंतर एकमेव रुग्णालय म्हणजे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र, या रुग्णालयात रात्रभर डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. यासाठी ‘उरण'चे आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सदर रुग्णालयातील समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील जनता व्यक्त करत आहे.

 उरण परिसरातील गरीब, गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र अशी सध्या २ उपचार केंद्र आहेत.३० खाटांच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर अवघ्या तालुक्याचा भार आहे. दररोज २५०  बाह्यरुग्णांची वर्दळ असलेल्या ग्रामीण रुग्णालयावर इतर अनेक कामांचा वाढता ताण आहे. या उलट ग्रामीण भागात असलेले कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे उरण परिसरातील विशेषतः ग्रामीण भागातील गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आश्रयाला ये- जा करत आहेत.

मात्र, ग्रामीण भागातील गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ये-जा करत असताना. मात्र, रात्री ७ वाजल्यानंतर कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर थांबत नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करत पनवेल, नवी मुंबई येथील रुग्णालयात रुग्णांना दाखल करावे लागले आहे. तालुवयातील गोर-गरीब रुग्णांना कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी आमदार महेश बालदी आणि माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी जातीने लक्ष घालून कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, परिचारिका यांची रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक मित्र-मंडळींनी केली आहे.

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या फक्त दोनच महिला डॉक्टर कार्यरत आहेत. मात्र, दोन्ही महिला डॉक्टर रात्री ७ नंतर थांबत नाही. यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. सदरची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. -डॉ. राजेंद्र ईटकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, उरण. 

Read Previous

क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

Read Next

रक्ताच्या कर्करोगापासून २१ महिन्यांच्या बाळाला जीवनदान