‘रबाले एमआयडीसी' पोलिसांचे कोंबींग ऑपरेशन

गुन्हेगार, अंमली पदार्थ तस्करांचे दणाणले धाबे
नवी मुंबई ः कोपरखैरणे नंतर नवी मुंबई पोलिसांनी रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबींग ऑपरेशन राबवून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या नायजेरीयन नागरिकासह पाच गुन्हेगारांची धरपकड केली आहे. त्याशिवाय पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशिटर, संशयित व्यक्तींची तपासणी करुन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ-१ मधील वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाचे जाळे उध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन सुरु केल्यामुळे गुन्हेगारांचे तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  
येत्या काही दिवसांवर ‘लोकसभा'ची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशिटर तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची झाडाझडती सुरु केली. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागामध्ये अचानक कोंबींग ऑपरेशन राबवून गुन्हेगार आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. नुकतेच २ मार्च रोजी पोलिसांनी कोपरखैरणे हद्दीत अचानकपणे कोंबींग ऑपरेशन राबवून परिसरात वावरणाऱ्या गुन्हेगारांची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी आता ७ मार्च रोजी रबाले एमआयडीसीच्या हद्दीत रात्री १० ते पहाटे ३ पर्यंत कोंबींग ऑपरेशन राबविले.  
यासाठी नवी मुंबई आयुक्तालयातील इतर पोलीस ठाण्यातील अतिरिक्त मनुष्यबळ तसाच राईट कंट्रोल पोलीस पथक असे एवूÀण २६ पोलीस अधिकारी आणि १७९ पोलीस अंमलदार मागवण्यात आले. त्यानंतर या पोलीस बळाची १३ तुकडीमध्ये विभागणी करुन ४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. तर उर्वरित ९ पथकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले.  
या कांेबींग ऑपरेशन दरम्यान भिमनगर झोपडपट्टीतील गार्डनजवळ पिटा किसीडी उर्फ मार्वलस (३२) नामक नायजेरीयन व्यक्ती ५५ कि.ग्रॅम वजनाच्या मॅथेड्रॉन या अंमली पदार्थासह सापडला. त्याचप्रमाणे दिपक बबन पवार गांजा विक्री करताना सापडला असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला ४.८३७ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. त्यामुळे या दोघांना एनडीपीएस ॲक्ट नुसार अटक केली. या तपासणी मोहिमेत करण राजा चोटले धारदार शस्त्र जवळ घ्ोऊन वावरताना सापडला. तर गोपालप्रसाद दिनानाथ तत्वा साईनगर भागात स्वतः जवळ चावूÀ घ्ोऊन फिरताना आढळून आला.  या दोघांविरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.  
या कोंबींग ऑपरेशन दरम्यान हद्दपार केलेला आरोपी सचिन गणपत बरफ संभाजीनगर भागात पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घ्ोण्यात आले आहे. या कोंबींग ऑपरेशन दरम्यान रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एवूÀण ४ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान एवूÀण २९ एमव्ही ॲक्ट नुसार कारवाई करण्यात आली. तसेच पाहिजे असलेल्या आरोपींची तपासणी करुन २ आरोपींवर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.  
या कोंबींग ऑपरेशन मध्ये पोलिसांकडून ३९ हिस्ट्रीशिटर पैकी २० गुन्हेगारांची तसेच गुंडा रजिस्टर मधील २१ आरोपींपैकी ९ आरोपींची त्याचप्रमाणे रेकॉर्डवरील २० गुन्हेगारांची देखील तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पोलिसांनी कोपटा अंतर्गत ८३ कारवाई, महाराष्ट्र पोलीस कायदा ३३, डब्ल्यु अंतर्गत १५, एमव्ही ॲक्ट १०२ प्रमाणे २९, तसेच भादंवि कलम २८३/२८५ प्रमाणे ४ कारवाया, एनबीडब्ल्यू वॉरंट अंतर्गत ५, बीडब्ल्यू वॉरंट अंतर्गत ६ करवाया करण्यात आल्या. तसेच ५० समन्सची बजावणी देखील यावेळी करण्यात आली. त्याशिवाय महाराष्ट्र प्रोव्हीबिशन ॲक्ट नुसार २ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. तसेच जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये १, अंमली पदार्थाचे सेवन करताना ५, ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह१ अशी देखील कारवाई करण्यात आली. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मारहाणीत १७ वर्षीय मुलाची हत्या