नौपाडा-कोपरी प्रभागातून १८ बेवारस वाहने आणि १८ टपऱ्यांचे निष्कासन

 ठाणे  : मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहीम ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू आहे. वागळे इस्टेट, वतर्कनगर या प्रभाग समिती क्षेत्रानंतर शनिवार, १३ जानेवारीपासून नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

           या मोहिमेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने नौपाडा-कोपरी क्षेत्रातील रस्त्यावरील बेवारस वाहने हटविण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार, परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. त्यात, नारायण कोळी चौक, चेंदणी कोळीवाडा, बारा बंगला, कोपरी कॉलनी येथील १३ बेवारस-भंगार वाहने उचलून बाटा कंपाऊंड येथे नेण्यात आली. तसेच, परबवाडी, मेंटल हॉस्पिटल, सिव्हिल रुग्णालयाच्या मागे, व बंजारा वस्ती परिसर या भागातून पाच बेवारस वाहने आणि १८ टपऱ्या हटविण्यात आल्या.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अनोळखी नंबरवरील लिंकवर क्लिक करणे पडले महाग