वाहन प्रदूषणाबाबत महापे वाहतूक शाखेकडून जनजागृतीपर कार्यक्रम

विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण टाळण्याचे वाहन चालकांना केले आवाहन 

नवी मुंबई : महापे वाहतूक शाखेने महापे गांव येथील महानगरपालिका माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाहन प्रदूषणबाबत जनजागृतीला सुरुवात केली आहे. या कार्यक्रमांतर्गत महापालिका शाळेतील नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी पथनाट्यच्या माध्यमातून पियुसी काढण्याचे तसेच वाहन चालकांनी अनावश्यक हॉर्न न वाजवता ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले. 

वाहन प्रदूषण आरोग्यास घातक असून त्यामुळे लोकांना अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण हेात आहेत. त्यामुळे वाहन प्रदूषण बाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून विविध कार्यक्रम व उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

महापे वाहतूक शाखेने याच कार्यक्रमांतर्गत महापे वाहतूक शाखा चौकी येथे महापे गांव येथील महानगरपालिका माध्यमिक शाळेतील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाहन प्रदूषणबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासित अली सय्यद यांच्या  पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून वाहन चालकांनी पियुसी काढणे आवश्यक आहे , वाहन चालकांनी अनावश्यक हॉर्न न वाजवता ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले. सदर पथनाट्य कार्यक्रमास 3 शिक्षक व 25 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी परिसरातील नागरिक तसेच महापे वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार उपस्थित होते.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई शहराला ‘हुक्का पार्लर'चे ग्रहण