लोक अदालतमध्ये कोपरखैरणे वाहतूक शाखेची उत्कृष्ट कामगिरी

वाहतूक कारवाईच्या सर्वात जास्त ३१८ केसेसची निर्गती

नवी मुंबई  : कोपरखैरणे वाहतूक शाखेने लोक अदालतीमध्ये दाखल करण्यात आलेल्या वाहतूक कारवाईच्या सर्वात जास्त ३१८ केसेसची निर्गती करुन सुमारे सव्वा लाख रुपयांचा दंड भरुन घेतला आहे. कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी लोक अदालतमध्ये केलेल्या या कामगीरीची बेलापूर न्यायालयाने दखल घेऊन या शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांचा विशेष सत्कार केला आहे.

कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी या वाहतूक शाखेचा पदभार स्विकारल्यानंतर कोपरखैरणे आणि घणसोली हद्दीतील नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळावेत यासाठी विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबवले आहेत: तसेच नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी त्यांचे प्रबोधन केले आहे. नागरीकांनी देखील कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद देऊन वाहतुकीचे नियम पाळण्यास सुरुवात केली. त्याशिवाय वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांच्यामध्ये देखील वाहतूक नियमांबाबत जनजागृती केल्याने वाहन चालकांमध्ये शिस्त लागली.

त्यामुळे कोपरखैरणे वाहतूक शाखेअंतर्गत येणाऱ्या कोपरखैरणे व घणसोली रेल्वे स्टेशन येथे सकाळी व सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन त्या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. या कामगिरी सोबतच कोपरखैरणे वाहतुक पोलिसांनी नुकत्याच पार पडलेल्या लोक अदालतीमध्ये वाहतूक कारवाईच्या नवी मुंबईत सर्वात जास्त केसेसची निर्गती करुन सुमारे सव्वा लाख रुपयांचा दंड भरुन घेतला आहे. त्यामुळे बेलापूर न्यायालयाने सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांचा विशेष सत्कार केला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वेश्वी गावातील २२ भटक्या कुत्र्यांवर ॲसिड हल्ला; ३ कुत्र्यांचा मृत्यू