ड्रग्ज बनविणाऱ्या दोन फॅक्ट्रीवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई  

६ कोटी रुपयांचे एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त  

नवी मुंबई : पेंट बनवण्याच्या नावाखाली एमडी ड्रग्जचा कारखाना चालविणाऱ्या ६ जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. सदर टोळी खोपोली मधील एका बंद पडलेल्या कंपनीतून आणि खोपोली-पाली रोडवरील एका फार्महाऊस मधून एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्ज बनविणारे कारखाने चालवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत नवी मुंबई पोलिसांनी तब्बल ५ कोटी ३९ लाख ६० हजार रुपये किमतीचे ५ किलो ३९६ ग्रॅम वजनाचे एम.डी.(मेफेड्रॉन) अंमली पदार्थ तसेच मेफेड्रॉन अंमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारे ४५ लाख रुपये किमंतीचे साहित्य आणि कच्चा माल जप्त केला आहे.  

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शादाब सईद सय्यद (वय-४२), सोहेल मुन्नवर अली लांबे (वय-३८), वजहुल वफा चौधरी (वय-५५), सैफुल्ला शेख उर्फ सैफ बटाटा (वय-२८), मोहसीन अन्सारी (वय-३६), सीदधा पाल (वय-३३) या सहा जणांचा समावेश आहे. यातील सैफुल्ला शेख, फायनान्सर असून त्याचा खोपोली-पाली रोडवर उंबरे गाव येथे फार्महाऊस आहे. या टोळीने खोपोलीतील एक बंद पडलेली कंपनी पेंट बनविण्याच्या बहाण्याने भाड्याने घ्ोऊन त्याठिकाणी आणि सैफुल्ला शेख याच्या फार्महाऊसमध्ये एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्ज बनविणारे कारखाने सुरु केले होते. त्यानंतर या टोळीने एका विक्रेत्याकडून एम.डी. बनविण्यासाठी लागणारे केमिकल आणि कच्चा माल घ्ोऊन मोठ्या प्रमाणात एम.डी.ड्रग तयार केले होते. याच टोळीतील एक व्यक्ती गत ३ डिसेंबर रोजी मुंबई-गोवा महामार्गावर शिरढोण गावाजवळ एम.डी. (मेफेड्रॉन) नामक अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आला असताना नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला अटक केली होती. तसेच त्याच्या ताब्यात असलेला ६ लाख १० हजार रुपये किंमतीचा ६१ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन नामक अंमली पदार्थ जप्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी सदर गुन्ह्याचा अधिक तपास करुन बदलापुर आणि खालापुर येथुन आणखी तीन आरोपीना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत ते खोपोली येथील ढेकु गावालगतच्या एका बंद पडलेल्या कंपनीत आणि खोपाली-पाली रोडवरील उंबरे गाव येथील फार्महाऊस मधुन एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्ज बनविणारे कारखाने चालवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश घुमाळ आणि पोलीस उपनिरीक्षक कुलदिप मोरे यांची दोन पथके तयार करुन खोपोली, खालापुर येथील बंद कंपनी आणि फार्महाऊसवर छापे टाकले. यावेळी सदर ठिकाणी सापडलेले ५ कोटी ३९ लाख ६० हजार किमतीचे ५ किलो ३९६ ग्रॅम वजनाचे एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ तसेच मेफेड्रॉन पदार्थ बनविण्यासाठी लागणारे ३३० लिटर केमिकल्स, २५ किलो पावडर असा ४५ लाख रुपये किंमतीचा कच्चा माल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी सदर कंपनी आणि फार्महाऊस सिल करुन आरोपीची दोन चार चाकी वाहने, ९ मोबाईल फोन देखील जप्त व्ोÀली आहेत.  

पोलीस कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी ३१ डिसेंबर रोजीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात एमडी तयार करत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. या टोळीमध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असून, गुन्हे शाखेकडून त्याबाबबत अधिक तपास करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या आजुबाजुच्या पलॅट अथवा बंद कंपनीमध्ये अशा प्रकारचे काही संशयास्पद आढळून आल्यास त्यांनी पोलिसांच्या ११२ नंबरवर संपर्क साधुन त्याची माहिती पोलिसांना द्यावी. - अमित काळे, पोलीस उपआयुक्त - गुन्हे शाखा, नवी मुंबई.
कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींनी फक्त बारावी पर्यंतचे शिक्षण घ्ोतले आहे. यातील आरोपीत वजहुल चौधरी याच्यावर यापुर्वी ‘डीआरआय'ने कारवाई केली असून, १६ वर्षे तो कारागृहात होता. तसेच सैफुल्ला शेख उर्फ सैफ बटाटा याच्यावर देखील नाशिक येथे अंमली पदार्थाशी संबधित गुन्हे दाखल आहेत. कारागृहात सदर आरोपी काही गुन्हेगारांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी एमडी बनविण्याचे ऑनलाईन व्हिडीओ पाहून एमडी बनविण्यास सुरुवात केल्याचे पोलीस तपासात आढळुन आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

लोक अदालतमध्ये कोपरखैरणे वाहतूक शाखेची उत्कृष्ट कामगिरी