तुर्भे वाहतूक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती  

तुर्भे वाहतूक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन

नवी मुंबई : वाहतुकीच्या नियमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने तुर्भे वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारी नेरुळ येथील रियान इंटरनॅशनल स्कूलमध्ये वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले.  

सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन, अपघाताच्या घटनात वाढ होताना दिसुन येत आहे. अनेक वाहन चालकांकडून वाहतूकीचे नियम पाळले जात नसल्यामुळे अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी व युवा पिढीमध्ये वाहतूक नियमाबाबत जनजागृती झाल्यास लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये एक शिस्तप्रिय चालकाची कल्पना स्पष्ट होईल. यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी विविध उपक्रम सुरु केले आहेत.  

याच पार्श्वभुमीवर तुर्भे वाहतूक शाखेच्या वतीने नेरुळ येथील रियान इंटरनॅशनल स्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृतीपर विशेष कार्यक्रमात तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे व पोलीस उपनिरीक्षक महाजन यांनी विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या नियमांचे महत्त्व पटवुन देतानाच अपघात कसे घडतात आणि अपघात कसे टाळता येऊ शकतात याचे मार्गदर्शन केले. तसेच आपण स्वत: व इतरांनी वाहतूक नियम कसे पाळायचे याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तुर्भे वाहतूक शाखा तसेच शाळेचे मुख्याध्यापक, स्टाफ व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

घरफोडी चोरी करणारी सराईत दुक्कली गजाआड