रस्त्यालगत पार्क असलेल्या दुचाकी चोरणा-या चोरट्याला  नेरुळ पोलिसांनी केली अटक  

दुचाकी चोरी व बॅटरी चोरीचे ५ गुन्हे उघड

 नवी मुंबई  : रस्त्यालगत पार्क असलेल्या दुचाकी चोरणा-या एका चोरट्याला  नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. कुणाल बाळू सोनवणे (२४) असे या चोरट्याचे नाव असून त्याने नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार दुचाकी व एक बॅटरी चोरल्याचे उघडकीस आले आहेत. या गुह्यातील चारही दुचाकी आणि बॅटरी हस्तगत करण्यात नेरुळ पोलिसांना यश आले आहे.  

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव कुणाल बाळू सोनवणे नेरुळच्या सारसोळेत राहण्यास असून तो डिलिव्हरीचे काम करत होता. तसेच तो रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरत होता. गत तीन सफ्टेंबर महिन्यामध्ये त्याने नेरुळ सेक्टर-१० मध्ये रस्त्यालगत पार्क असलेल्या एका डॉक्टरची दुचाकी चोरली होती. या प्रकरणी नेरुळ  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्या सुचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेवाळे, सपोनि सचिन ढगे व त्यांच्या पथकाने नेरूळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.  

तसेच तांत्रिक विश्लेषण व गुफ्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सारसोळे येथून कुणाल सोनवणे या चोरट्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नेरुळ सेक्टर-१० मधुन दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे सखोल तपास केला असता चोरट्या कुणाल याने नेरुळच्या विविध भागातून आणखी ३ दुचाकी व एका वाहनातील बॅटरी चोरल्याचे उघडकीस आले आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करुन त्याने चोरलेल्या चार दुचाकी व बॅटरी हस्तगत केले आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बेलापूर न्यायालयात कौटुंबिक न्यायालय सुरु