ट्रान्सफॉर्मरच्या चोरीच्या घटनेत वाढ 

उरण तालुक्यात उरला फक्त ट्रान्सफॉर्मरचा सांगाडा

उरण : उरण तालुक्यात ट्रान्सफॉर्मर मधिल आँईलची चोरी बरोबर ट्रान्सफॉर्मरच्या चोरीत सर्रासपणे वाढ होत आहे.अशा चोरीच्या घटनांचा पर्दाफाश करण्यास महावितरण कंपनीचे अभियंता तसेच पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच भेंडखळ ते करंजा खाडीकिनाऱ्या वरील कोस्टल रोड जवळील ट्रान्सफॉर्मर मधिल साहित्य चोरीस जाऊन फक्त सांगाडा पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

उरण तालुक्याचे औद्योगिकरण आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. अशा वाढत्या औद्योगिकरणातील प्रकल्पांना, रहिवाशांना विद्युत पुरवठा करण्याचे काम हे महावितरण कंपनी उरणच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यासाठी ठिक ठिकाणी महावितरण कंपनीच्या देखरेखीखाली विद्युत उपकरण म्हणून ट्रान्सफॉर्मर हे बसविले जातात हे विद्युत उपकरण त्या त्या ठिकाणा वरील विजेचा दाब कमी-जास्त करणे, सामान्यपणे वीज पुरवठा करणे हे  मुख्य काम करत असतात. एकंदरीत ट्रान्सफॉर्मर हे आवश्यकतेनुसार वीज पुरवठा करण्याचे काम करतो. एखाद्या परिसरातील लोकांना अधिक व्होल्टेज ऊर्जा आवश्यक असल्यास तिथे अधिक व्होल्टेज वीज पुरवठा हा बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर कडून केला जातो.

अशा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मधिल आँईलच्या चोरी बरोबर ट्रान्सफॉर्मरच्या चोरीत सर्रासपणे वाढ होत आहे. या घटनेसंदर्भात महावितरण कंपनीकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येते. मात्र अशा चोरीच्या घटनांचा पर्दाफाश करण्यास महावितरण कंपनीचे अभियंता तसेच पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.त्यातच भेंडखळ ते करंजा खाडीकिनाऱ्या वरील कोस्टल रोड जवळील ट्रान्सफॉर्मर मधिल साहित्य चोरीस जाऊन फक्त सांगाडा पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

उरण तालुक्यात मागील वर्षभरात किती ट्रान्सफॉर्मरच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत त्या संदर्भात महावितरण कंपनी उरणचे अभियंता विजय सोनवणे यांना विचारणा केली असता त्यांनी सरळ सांगितले की मी बाहेर असल्याने मला सविस्तर माहिती देता येत नाही.मी कार्यालयात गेल्यावर माहिती घेऊन आपणांस सांगतो.असे मलमली उत्तर दिले आहे.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पनवेल आरटीओ मध्ये एजंटचीच भाऊगर्दी