महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
खारघर मध्ये सिडको तर्फे डेब्रिज माफियांवर कारवाई
७ दिवसात डेब्रिज टाकणारे १४ डंपर जप्त
खारघर : ‘सिडको'च्या दक्षता विभाग आणि अभियांत्रिकी विभाग पथकाने खारघर मध्ये डेब्रिज टाकणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई केल्यामुळे डेब्रिज माफियांचे धाबे दणाणले आहेत.
खारघर परिसरात ‘सिडको'चे अनेक भूखंड मोकळे आहेत. सदर भूखंडावर रात्री डेब्रिज माफियांकडून डेब्रिज टाकले जात आहे. याबाबत अनेक वेळा वर्तमानपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. सदर बातमींची दखल घेवून ‘सिडको'च्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी डेब्रिज माफियांवर कारवाई करण्यासाठी सिडको दक्षता विभाग, अभियांत्रिकी विभाग, सुरक्षा विभाग आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग कृती पथकाची नेमणूक केली होती. २९ नोव्हेंबर रोजी रात्री खारघर परिसरात डंपर मधून डेब्रिज खाली करीत असल्याचे आढळून आले. यावेळी सदर पथकाने डंपर आणि डंपर चालक मंगेश गौतम पहूरकर (वय-३३) यास रंगेहात पकडून खारघर पोलिसांच्या स्वाधीन केले. खारघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या आदेशानंतर ‘सिडको'चे दक्षता विभाग प्रमुख सुरेश मेंगडे यांनी विविध सिडको विभागांचे कृती दल स्थापन केले आहे. याच वेगवेगळ्या दलाने मागील ७ दिवसात डेब्रिज टाकणारे १४ डंपर जप्त करुन १८ व्यवतींवर कारवाई केली आहे.