जागतिक स्मरण दिन सप्ताह निमित्त कोपरखैरणे वाहतूक शाखेच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती   ​​​​​​​

१९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान रस्ते अपघाताबाबत विविध जनजागृतीपर कार्यक्रम

नवी मुंबई : जागतिक स्मरण दिनाच्या अनुषंगाने रस्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या, गंभीर जखमी झालेल्या, अपघातामध्ये अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तसेच अपघात पिडीतांच्या कुटुंबियांच्या सात्वनाकरीता त्यांना कायदेशीर मार्गदर्शनाकरिता सामाजिक जबाबदारी म्हणून दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवारी जागतिक स्मरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  

जागतिक स्मरण दिन सफ्ताह निमित्त कोपरखैरणे वाहतूक शाखेच्यावतीने गुरुवारी डी मार्ट, बस डेपो तसेच कोपरखैरणे सेक्टर १० या ठिकाणी कॉर्नर मीटिंग घेऊन रस्ता सुरक्षा व वाहन अपघात झाल्यावर घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करून जानजगृती करण्यात आली असल्याची माहिती कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी दिली.  

दरम्यान, १९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान रस्ते अपघाताबाबत विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सदर कार्यक्रमांच्या अनुषंगाने रस्ते अपघातासारख्या भीषण परिस्थितीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणेकरिता वाहतूक विभागाकडून व्हिडीओ क्लीप, पोस्टर्स याद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यरत सामाजिक संस्था, रस्ते सुरक्षेबाबत कार्य करणाऱया संस्था, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या मदतीने शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, बस डेपो, एसटी डेपो, रेल्वेस्थानक तसेच लोकांच्या रहदारीच्या ठिकाणी चिटकवून जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ऑनलाईन १८ लाख ५८ हजार रुपये उकळणाऱ्या सायबर टोळीतील एक आरोपी अटकेत