महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
हॉटेल मालक आणि वेटरवर चॉपरने हल्ला
जेवणाची ऑर्डर आणायला उशीर - हॉटेलमध्ये तरुणाचा धिगाणा
ठाणे : हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर उशीर झाल्याने टेबल उलटवून हॉटेलमध्ये धिगाणा घालून वाढलेल्या शाब्दिक चकमकीनंतर झालेल्या राड्यात कासारवडवली पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेलमध्ये धुडगुस घातलेला सर्व प्रकार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. तर सर्व आरोपी फरार असून कासारवडवली पोलीस त्यांचा शोध घेत असून अधिक तपास करण्यात येत आहे.
बुधवारी (२२ नोव्हेंबर) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा राडा झाला. फिर्यादी संतोष कोरगय्या शेट्टी(४२) रा. फ्लॅट नं.४०५, बिल्डींग नं. ८, राजरत्न पार्क, जी. बी. रोड ठाणे पश्चिम,येथे ब्रह्मांड आझाद नगर परिसरात सागर गोल्डन हील टॉप नावाचे हॉटेल कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. घटनेच्या दिवशी बुधवारी २२ नोव्हेंबर, २०२२ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ओंकार भोसले व अभि पाटील हे हॉटेलच्या टेरेस वर बसलेले होते. त्यांचा मित्रही आला. त्यानंतर त्यांनी ड्रिंक आणि जेवणाची ऑर्डर दिली. सदर ऑर्डर आणण्यास उशीर झाल्याने तिघांनी टेबल जोरात वाजविणे सुरु केले. वेटरला शिवीगाळी करू लागले. त्यावेळी फिर्यादी संतोष शेट्टी यांनी टेरेसवर बसलेल्या भोसले, पाटील आणि त्यांचा मित्र याना टेबल वाजवू नका असे सांगितले. तेव्हा याचा राग मनात धरून अभि पाटील याने टेबल उलट केला. तेव्हा वेटरच्या मदतीने तिघांना खाली आणून हॉटेलच्या बाहेर जाण्यास सांगितले. तिघेही बाहेर गेले. काही वेळाने आरोपी ओंकार भोसले यांनी बाजूला सुरु असलेल्या चायनीज दुकानात गेला. आणि लोखंडी चॉपर घेऊन हॉटेलमध्ये घुसला आणि दहशत पसरवू लागला. थांबविण्यासाठी आलेल्या पार्टनर निलेश अण्णा आणि वेटर याच्यावर चॉपरने वर करून हॉटेलचा बोर्ड तोडण्यात आला. हॉटेल मालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बोलावण्यात आले. आरोपी ओंकार भोसले व अभि पाटील व त्याच्या साथीदार तेथुन त्याच्या मोटार सायकलने पळून गेले. दरम्यान तिन्ही तरुणांचा हॉटेलमध्ये केलेल्या राड्याचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तर कासारवडवली पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.