खारघर मध्ये धावत्या ‘स्कुल बस'ला आग ; अनर्थ टळला

खारघर मध्ये धावत्या ‘स्कुल बस'ला आग

खारघर ः खारघर मध्ये विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या स्कुल बसला आग लागल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली. घटनेचे गांभीर्य वेळीच लक्षात आल्याने बस चालक आणि मदतनीस यांनी बस मधील विद्यार्थ्यांना तत्काळ बस बाहेर काढले. तसेच तत्काळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्याने वेळीच आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला. सदर बस ‘रेडक्लिप स्कुल'ची होती. आग लागली त्यावेळी स्वुÀल बस मध्ये २३ विद्यार्थी होते.

खारघर सेक्टर-८ मध्ये रेडक्लिप स्कुल आहे. ४ नोव्हेंबर रोजी सकाळ सत्राची शाळेची सुट्टी झाल्यावर विद्यार्थ्यांना घरी  सोडण्यासाठी स्कुल बस शाळेच्या आवारातून बाहेर पडल्यावर एक किलोमीटर अंतरावर उत्सव चौक कडून सेंट्रल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर  बसच्या इंजिन मधून धूर येत असल्याची माहिती बस चालकाच्या निदर्शनास येताच त्याने तात्काळ विद्यार्थ्यांना बस मधून खाली उतरण्यास सांगितले. दरम्यान, हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्निशमन केंद्राला माहिती प्राप्त होताच तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घ्ोत स्वुÀल बसला लागलेली आग आटोक्यात आणली. यावेळी बस मध्ये २३ विद्यार्थी होते. सदर घटनेची नोंद खारघर पोलीस ठाणे मध्ये करण्यात आली आहे, असे पोलीस अधिकारी अमोल खाडे यांनी सांगितले.

मागील वर्षी सप्टेंबर, जुलै मध्ये नवीन पनवेल पुल आणि सीएनजी पंप जवळ शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या वाहनास आग लागून काही क्षणात त्या गाडीचा कोळसा झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सीबीडी-बेलापूर येथील पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शाळेची बस विद्यार्थ्यांना घ्ोवून जात असताना खारघर मधील घरकुल आणि गुडवील सोसायटी समोरील रस्त्यावर स्वुÀल बसला आग लागली होती. यावेळी रस्त्यावर असलेल्या नागरिकांनी बस मधून धूर येत असल्याचे स्कुल बस चालकाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी बस मध्ये असलेल्या तीन विद्यार्थ्यांना बस मधून खाली उतरवण्यात आले. मात्र, या आगीत स्वुÀल बसचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या वाहनांची सुरक्षा तपासणी पनवेल उप प्रादेशिक परिवहन विभागाने करणे आवश्यक आहे. ‘रेडविलप स्वुÀल बस'च्या इंजिन मध्ये आग लागल्याचे बस चालकाच्या निदर्शनास आले म्हणून दुर्घटनेत जीवितहानी टळली. जर आग बसच्या मागील बाजूला लागली असती तर मोठी घटना घडली असती. - संजय घरत, प्रत्यक्षदर्शी - माजी उपसरपंच, बेलपाडागाव, खारघर. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मोबाईल फोन स्नॅचींग करणारी टोळी गजाआड