मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीचे अमिष दाखवून डॉक्टरला लुबाडल्याची घटना उघडकीस
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीचे अमिष दाखवून सायबर चोरटयानी डॉक्टरला घातला 1 कोटी 32 लाखांचा गंडा
नवी मुंबई : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा मिळवुन देण्याचे अमिष दाखवून एका सायबर टोळीने सानपाडा भागात राहणाऱया एका डॉक्टरकडून तब्बल 1 कोटी 31 लाख 92 हजाराची रक्कम लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनंतर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अज्ञात टोळी विरोधात फसवणूकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेले 40 वर्षीय डॉक्टर सानपाडा येथे राहण्यास असून ते एका खाजगी हॉस्पीटलमध्ये कार्यरत आहेत. गत एप्रिल महिन्यामध्ये सायबर चोरटयाच्या टोळीने या डॉक्टरला हॉँगकाँग येथील नोहा इन्वेस्टमेंट कंपनीच्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला नफा मिळवून देण्यात येत असल्याचा मेसेज पाठवून दिला होता. डॉक्टरने सदर कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्यानंतर सायबर टोळीतील निकोला नामक महिलेने डॉक्टरला ऍटोमस ग्लोबल ट्रेडींग अकाऊंटची लिंक पाठवून देत त्यात नोंदणी करण्यास तसेच बिनान्स ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर डॉक्टरला बिनान्स ऍपवरुन युएसडीटी कसे खरेदी करायचे व ते ऍटमोसमध्ये डिलींगसाठी कसे ट्रान्सफर करायचे याची माहिती डॉक्टराला देण्यात आली. त्यानंतर डॉक्टरने बिनान्सवरुन डिलींगला सुरुवात केल्यानंतर निकोला हिने जास्त फायदा हवा असल्यास सिनियर ग्रुपवर जास्त गुंतवणूक करण्यास सांगिलते. तसेच सायबर टोळीने डॉक्टरला तिसऱया ग्रुपमध्ये ऍड करुन त्यांच्यासोबत दहा दिवसांचे बोगस ऍग्रीमेंट देखील केले. त्यानंतर डॉक्टरने सायबर टोळीतील अँडरसन व वॉर्नर यांच्या सांगण्यानुसार क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. दहा दिवसानंतर डॉक्टरला मोठा फायदा झाल्याचे भासविण्यात आले.
त्यातील नफा काढण्यासाठी डॉक्टरने निकोलाला संपर्क साधला असता, तीने ऍग्रीमेंटनुसार कंपनीला 30 टक्के कमिशन द्यावे लागेल असे सांगितले. त्यानुसार डॉक्टरने 30 टक्के प्रमाणे 60066.33 युएसडीटी टफ्फ्या टफ्फ्याने सायबर चोरटयानी दिलेल्या वॉलेटवर पाठविले. त्यानंतर डॉक्टरने आपला नफ्यासाठी संपर्क साधला असता, डॉक्टरला त्याच्या नफ्याच्या रक्कमेचा टॅक्स भरण्यास सांगण्यात आले. सदर टॅक्स सुद्धा डॉक्टरने भरला. अशा पद्धतीने डॉक्टरने स्वत:कडील रक्कम व इतर कर्ज घेऊन युएसडीटी खरेदी करुन मिळवलेला नफा, कमीशन तसेच क्रिफ्टो करन्सी टॅक्स अशी एकुण 131717.39 (भारतीय मुल्य 1 कोटी 31 लाख 92 हजार रुपये) सायबर चोरटयानी सांगितल्यानुसार त्यांच्या वॉलेटमध्ये जमा केले.
त्यानंतर डॉक्टरने आपली रक्कम परत मिळविण्यासाठी निकोला हिच्याकडे विचारणा केली असता, त्यांना आणखी रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे डॉक्टरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.