अश्विनी बिद्रे हत्याकांड

पोलिसांनी सरकारी वकिलांना मानधन अदा; खटल्याचे कामकाज सुरु

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला लढवणारे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचे मानधन नवी मुंबई पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे ॲड. घरत १३ ऑवटोबर रोजी झालेल्या सुनावणीला पनवेल न्यायालयात उपस्थित राहिले. मानधनापोटी त्यांचे एकूण १५ लाख रुपये थकले असून त्यापैकी ८ लाख १० हजार रुपये १२ ऑवटोबर रोजी रात्री पोलिसांनी घरत यांच्या खात्यात जमा केले. राहिलेले मानधनही लवकरच त्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे घरत यांनी पुन्हा खटल्याच्या कामकाजास सुरुवात केली आहे.

अश्विनी बिद्रे हत्याकांड खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात सध्या शेवटचे साक्षीदार सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांची साक्ष सुरु आहे. खटल्याचा निकाल दोन-अडीच महिन्यात लागण्याची शक्यता असली तरी पोलिसांनी सरकारी वकील प्रदीप घरत यांचे १५ लाख रुपयांचे मानधन शासनाने थकवले होते. त्यामुळे जोपर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत कोर्टाची पायरीही चढणार नाही, असा निर्धार घरत यांनी केला होता. परिणामी, पाच तारखांपासून या खटल्याचे कामकाज रखडले होते. याप्रकरणी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सर्वच स्तरांतून टिकेची झोड उठल्यानंतर पोलिसांनी घरत यांचे मानधन रातोरात त्यांच्या खात्यात जमा केले.


पुढील सुनावणी २० ऑक्टोबरला...
तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांची सध्या पनवेल न्यायालयात सरतपासणी सुरु आहे. २० ऑवटोबर रोजी ती पूर्ण होणार होती. मात्र, न्यायाधीशांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे सरतपासणी झाली नाही. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुनावणीदरम्यान मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर हेही न्यायालयात हजर होते. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ऑनलाईन ६.६२ कोटी रुपये उकळणाऱ्या टोळीतील दुवकल जेरबंद