पोलिसांनी केले नाष्टा, पाणी, जेवणाचे वाटप

 एकस्प्रेस गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावून आले पोलीस

नवीन पनवेल : ट्रॅक वरुन मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील अनेक एकस्प्रेस गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. सदर प्रकाराचे गांभिर्य ओळखून पनवेल शहर पोलिसांनी गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना नाष्टा आणि जेवणाचे वाटप केले. त्यामुळे प्रवाशांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास पनवेल रेल्वे स्टेशन जवळ मालगाडी रुळावरुन घसरल्याने या मार्गावरील सर्व ट्रेन थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. ट्रेन नसल्यामुळे कित्येक तास प्रवाशांना थांबून राहावे लागले होते. तर काहीजण उपाशी देखील होते. काहींना जेवणाची भ्रांत सतावत होती. अखेर या प्रवाशांच्या मदतीला पोलीस धावून आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई पोलिसांनी नविन पनवेल गुरुद्वारा, खारघर
गुरुद्वारा तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने प्रवाशांना नाष्टा-पाणी, जेवण वाटप  केले.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पोलीस चौक्या लुप्त