स्वच्छता मोहिमेत नवी मुंबई पोलिसांचा उत्स्फुर्त सहभाग

पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिसराची स्वच्छता


नवी मुंबई : केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नवी मुंबई पोलिसांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाणे आणि त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या वसाहती, हुतात्मा स्मारक, इतर शाखा प्रभारी अधिकारी त्याचबरोबर पोलीस आयुक्तालय अंतर्गत नेमणुकीस असलेले सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी यांनी आपआपल्या स्तरावर स्वच्छता मोहीम राबवली.

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह-आयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) त्याचप्रमाणे इतर सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्वतःहून या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होऊन ४० पोलिस अधिकारी तसेच २९५ पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन स्टाफच्या मदतीने पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिम राबविली.  याशिवाय उरण पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या चिरनेर हुतात्मा स्मारक येथे उरण पोलिस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी आणि ९ पोलीस अंमलदार त्याचबरोबर तेथील ग्रामस्थ यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

त्याचप्रमाणे कळंबोली येथील पोलीस मुख्यालयातील तसेच नवी मुंबई मोटार परिवहन विभागातील पोलीस अधिकारी, अंमलदार, शाळकरी मुले अशा ३५० जणांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. तसेच पोलीस आयुक्तालयातील सर्व सफाई कामगारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सप्टेंबर मध्ये सेवानिवृत्त होत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग मोरे यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पोलिसांनी केले नाष्टा, पाणी, जेवणाचे वाटप