नवी मुंबईत वाहने पार्क करण्यास व मार्गस्थ होण्यास देखील मनाई  

अनंत चतुर्दशी व ईद ए मिलादच्या दिवशी नवी मुंबईत जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी  

नवी मुंबई : अनंत चतुर्दशी व ईद ए मिलाद निमित्त 28 आणि 29 सफ्टेंबर या दिवशी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सर्व प्रकारच्या जड अवजड माल वाहतूक करणाऱया वाहनांना नवी मुंबईच्या हद्दीत प्रवेश करण्यास तसेच मार्गस्थ होण्यास व वाहने पार्क करण्यास पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी त्याबाबतचे आदेश जारी केले आहे.  

28 सफ्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्यावेळी वाहतूक व गणपती मिरवणूका सुरळीत ठेवण्यासाठी तसेच त्याच्या दुसऱया दिवशी असलेले ईद ए मिलाद हा सण सुरळीत पार पडावा यासाठी नवी मुंबई पोलिसांनी 28 आणि 29 सफ्टेंबर या दोन दिवशी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड अवजड मालवाहतूक वाहनांना प्रवेश करण्यास तसेच नवी मुंबईमध्ये वाहने पार्क करण्यास तसेच नवी मुंबईतून दुसरीकडे मार्गस्थ होण्यास बंदी घालण्यात आली आहे.  

28 सफ्टेंबर रोजी गणपती विसर्जनाच्या मिरवणूका व दुस-या दिवशी असलेल्या ईद ए मिलाद निमित्त होणाऱया  मिरवणुका संपेपर्यंत ही बंदी राहणार आहे. वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबतची अधिसुचना जारी केली असून या अधिसुचनेतून अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना वगळण्यात आले आहे. या अधिसुचनेचा भंग करणा-या वाहन चालकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा देखील वाहतूक पोलिसांकडुन देण्यात आला आहे.    

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मोरबे जल पूजन प्रकरण :