फरार आरोपी ३० वर्षांनंतर गजाआड

हत्येच्या गुह्यातील आरोपी पनवेल शहर पोलिसांकडून गजाआड

नवी मुंबई :  पनवेल मध्ये नोव्हेंबर १९९४ मध्ये घडलेल्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अमृतसर पंजाब येथून दहा दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अटक केली आहे. बिट्टुसिंग अर्जुनसिंग असे या आरोपीचे नाव असून तो अमृतसर येथे बलविंदरसिंग दर्शनसिंग असे नाव बदलून राहत होता. या आरोपीचे कोणत्याही प्रकारचे छायाचित्र अथवा मोबाईल क्रमांक उपलब्ध नसताना पोलिसांनी त्याची माहिती काढून त्याला तब्बल ३० वर्षांनंतर गजाआड केले आहे.  

सदर प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी बिट्टूसिंग अर्जुनसिंग मजबी आणि त्याचे साथीदार बलविंदरसिंग अमरसिंग मजबी, बाऊसिंग अर्जुनसिंग गौडस या तिघांनी नोव्हेंबर १९९४ रोजी काशमीरासिंग अजितसिंग विर्क उर्फ जाट (३८) याच्या डोक्यामध्ये लोखंडी टॉमीने हल्ला करुन त्याची हत्या केली होती. मृत काशमीरासिंग याने सलविंदरसिंग मजवी याला चालकाच्या नोकरीतून काढून टाकल्याचा राग मनात धरुन सदर तिघांनी त्याची हत्या करुन पलायन केले होते. त्यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या गुन्ह्यातील आरोपी फरार होते.  

दरम्यान, परिमंडळ-२ चे पोलीस उप2युक्त पंकज डहाणे यांनी अभिलेखावरील हत्येच्या गुह्यातील फरार असलेल्या आरोपींविरोधात विशेष शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी १९९४ मध्ये घडलेल्या हत्या प्रकरणातातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार केले होते. या तपास पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपीचे कोणत्याही प्रकारचे छायाचित्र अथवा मोबाईल क्रमांक उपलब्ध नसताना फरार आरोपी बाबत माहिती संकलित केली.  

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गोपनीय सूत्रांकडून माहिती काढली असता, सदर गुह्यातील आरोपींपैकी चाऊसिंग अर्जुनसिंग गौरास मृत झाल्याचे तसेच आरोपी बिट्टुसिंग अर्जुनसिंग त्याचे नाव बदलून बलविंदरसिंग दर्शनसिंग या नावाने राहत असल्याची माहिती मिळाली. सदर गुन्हा ३० वर्षापूर्वीचा असल्याने पोलिसांच्या पथकाने अमृतसर येथील स्थानिक पोलीस ठाण्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांशी समन्वय साधून दहा दिवसांच्या शोध महिमेनंतर अमृतसर मधून आरोपी बिट्टू सिंग अर्जुन सिंग (बलविंदरसिंग दर्शन सिंग) याला ताब्यात घेतले.  

३० वर्षांपूर्वी पनवेल मध्ये घडलेल्या टँकर चालकाच्या हत्या प्रकरणातील आरोपी बिट्टू सिंग अर्जुनसिंग सदर घटनेनंतर फरार होता. तसेच तो अमृतसर येथे नाव बदलून राहत होता. पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने त्याची माहिती काढून त्याला अटक केली आहे.  - पंकज डहाणे, पोलीस उपायुवत-परिमंडळ - २, नवी मुंबई. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेले त्रिकुट जेरबंद