राज्यात पोलीस निरीक्षकांची आठशे पदे रिक्त 

पोलीस दलावर कामाचा ताण वाढत असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा  

नवी मुंबई : विविध सण, उत्सव तसेच निवडणूक बंदोबस्तासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱया पोलीस निरीक्षकांच्या राज्यात सुमारे 800 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. गृहखात्याकडून मागील दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक दर्जाची पदे भरली न गेल्याने हि पदे रिक्त आहेत. 30 ते 35 टक्के पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने पोलीस दलावर या महत्त्वपुर्ण पदांअभावी कामाचा ताण वाढत असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे गृह विभागाने हि रिक्त पदे तत्काळ भरावीत अशी मागणी पोलीस दलातील अधिका-यांकडून करण्यात येत आहे.  

सण, उत्सव, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, गणेशोत्सव, ईद, पोळा, निवडणूक बंदोबस्तासह विविध प्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक दर्जाचे पोलीस अधिकारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक अशी दहा ते बारा वर्षे सलग सेवा दिल्यानंतर पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती दिली जाते. त्यामुळे हे पद केवळ दांडग्या अनुभवातून पदोन्नतीने भरले जाते. राज्यात 1 हजार 699 पोलिस ठाणे असून या पोलीस ठाण्यांसह पोलिस मुख्यालय, पोलिस dअधीक्षकांच्या अधिनस्त विविध शाखांमध्ये पोलिस निरीक्षकांची पदे भरली जातात. राज्यात पोलिस निरीक्षकांची सुमारे 3 हजार 500 पदे मंजूर आहेत.  
मात्र मागील दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक दर्जाची पदे भरली न गेल्याने पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेकडो सहाय्यक पोलीस निरीक्षकांमधुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षकांची तब्बल 800 पदे रिक्त असल्याने कार्यरत पोलीस अधिका-यांकडे प्रभारीची जबाबदारी सोपवली जात आहे. 30 ते 35 टक्के पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने पोलीस दलावर या महत्त्वपुर्ण पदांअभावी कामाचा ताण वाढत असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. मागील दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक दर्जाची पदे भरण्यासाठी गृहखाते, पोलीस महासंचालक स्तरावरुन हालचाली न झाल्याल्यामुळे सदर पदे रिक्त असल्याचे बोलले जात आहे.  

निवृत्ती, पदोन्नतीने वर्षाला 400 जागा खाली
राज्यात दरवर्षी 200 ते 250 पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त होतात. त्यांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भरल्या जातात. वर्षाला सुमारे दोनशे पोलीस निरीक्षकांना पदोन्नती दिली जाते होते. पुन्हा ही पदे रिक्त होतात. त्यामुळे चारशे ते साडेचारशे पोलीस निरीक्षकांच्या जागा कमी, अधिक प्रमाणात खाली जातात. या जागा भरणे गरजेचे असते. मात्र, बऱयाचदा विलंब झाला की, रिक्त जागांचा आकडा फुगत जातो. वेळीच नियुक्त्या न मिळाल्यास प्रभारींवर पोलीस ठाण्याचे कामकाज चालवण्याची जबाबदारी पडते.  

प्रमोशन न मिळताच झाले रिटायर
पोलीस महासंचालक स्तरावरुन वेळीच पदोन्नतीने पदे भरली जात नसल्यामुळे पोलिस निरीक्षक पदावरुन उपविभागीय पोलीस अधिकारीपदावर पदोन्नतीने पदस्थापना दिली जाते. मात्र अनेक पोलिस निरीक्षकांना पदोन्नतीच न मिळाल्याने प्रमोशनची वाट पाहत  अनेक पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांना पोलीस उपअधिक्षक (डीवायएसपी) दर्जाच्या पदाचे पेन्शन मिळू शकले नाही. तसेच त्या दर्जाच्या पदाचे पेन्शन देखील मिळू शकले नाही, याचीही खंत पोलिस वर्तुळात बोलून दाखवली जात आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने ई-चलानद्वारे दंड