कोपरी गावातील नायजेरियन पोलिसांच्या प्रतिक्षेत?

१ सप्टेंबर रोजीच्या कारवाईवेळी कोपरी मधील नायजेरियनकडे दुर्लक्ष

वाशी : नवी मुंबई पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी सहाशे जणांच्या फौजफाट्यासह नायजेरियन, केनियन, युगांडा मधील नागरिकांवर सर्जिकल स्ट्राईक केला. त्यामध्ये ७५ नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ५ कोटींहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाई मधून कोपरी गावाला वगळले असल्याने येथील नायजेरियन नागरिक आता पोलीस कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत का? असा सवाल येथील स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

शिक्षण अथवा नोकरीचा व्हिसा घेऊन अनेक नायजेरियन, केनियन, युगांडा मधील नागरिक सध्या नवी मुंबईत वास्तव्यास आहेत. मात्र, शिक्षणाचा हेतू पूर्ण न करता ते अंमली पदार्थाची विक्री आणि ऑनलाईन लॉटरी फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सामील असल्याचे पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाईवरुन निष्पन्न झालेले आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांच्या वतीने १ सप्टेंबर रोजी नायजेरियन, केनियन नागरिकांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. यात ७५ जणांना ताब्यात घेत त्यातील ३७ नागरिकांना अटक केली आहे. ५ कोटींच्या वर अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले.

दुसरीकडे मागील काही वर्षांपासून अशा परदेशी नागरिकांची वर्दळ कोपरी गावात देखील वाढलेली आहे. मात्र, १ सप्टेंबर रोजीच्या नवी मुंबई पोलिसांच्या सर्जिकल स्ट्राईक मधून कोपरी गावाला वगळण्यात आले. त्यामुळे कोपरी गावातील नायजेरियन नागरिक पोलीस कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत का? असा सवाल येथील स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबईत नायजेरियन, केनियन, युगांडा मधील नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहरात अजून इतर ठिकाणी अशा नागरिककांचे वास्तव्य  आहे का? याची खातरजमा करुन माहितीच्या आधारे पुढील कारवाई बाबत वरिष्ठ पातळीवर नियोजन केले जाईल. - विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, नवी मुंबई पोलीस आयुवतालय. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण :