महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
दिघा ते बेलापूर पर्यंत बोगस डॉक्टरांविरोधात शोध मोहीम उघडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
बोगस डॉक्टरांविरोधात शोध मोहिम राबविण्याची मागणी
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील दिघा ते बेलापूर पर्यंत बोगस डॉक्टरांविरोधात शोध मोहीम उघडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ‘एमआयएम विद्यार्थी आघाडी'चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात दिघा ते बेलापूर दरम्यानच्या परिसराचा समावेश होत आहे. नवी मुंबईत विकसित झालेला शहरी भाग, गांवठाण परिसर, माथाडी वसाहती, सिडको वसाहती, झोपडपट्टी, चाळी, खाण परिसर, डोंगराळ परिसर, आदिवासी भाग असा वेगवेगळ्या कंगोऱ्यांचा येथे समावेश आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक नवी मुंबई शहरात शिक्षणासाठी, रोजगार-व्यवसायासाठी आले असल्याने येथे मिनी भारताचे स्वरुप पहावयास मिळते. या ठिकाणी झोपडपट्टी, चाळी, गांवठाण परिसर, साडेबारा टक्के भूखंडावर उभारलेल्या वसाहती, खाण अथवा डोंगराळ परिसर आणि अन्य भागात बोगस डॉक्टर कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे. अनेक दवाखान्यावर डॉक्टरांच्या विचित्रच पदव्या पहावयास मिळतात. अनेक दवाखान्यांमध्ये डॉक्टरांना मिळालेले वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांच्या दवाखान्यात लावलेले पहावयास मिळत नाही. महापालिका प्रशासनाकडून बोगस डॉक्टरांविरोधात कधीही शोध मोहीम राबविण्यात येत नाही.
महापालिका स्थापनेपासून आजपर्यत २८-२९ वर्षाच्या काळात महापालिका प्रशासनाने किती वेळा बोगस डॉक्टरांसाठी शोध मोहीम उघडली आहे? आजतागायत पालिका प्रशासनाला किती बोगस डॉक्टर सापडले आहेत? किती डॉक्टरांवर कारवाई झालेली आहे? याचे उत्तरही महापालिका प्रशासनाला देता आलेले नाही. नवी मुंबईतील विविध ठिकाणी आजही मोठ्या संख्येने बोगस डॉक्टर कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरामध्ये व्यापक प्रमाणावर बोगस डॉक्टर शोधमोहिम उघडणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची छाननी करणे आवश्यक आहे. दवाखाने, हॉस्पिटल या ठिकाणी त्यांची प्रमाणपत्रे (झेरॉक्स) भिंतीवर दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. बोगस डॉक्टर रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी अनेकदा हेवी डोस देत असतात. त्यामुळे रुग्णाच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची प्रसंगी रुग्ण दगावण्याचीही भिती असते, असे शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री, महापालिका आयुवत यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
बोगस डॉक्टर शोध मोहीम अभियानात महापालिका प्रशासनाकडून आजवर उदासिनता दाखविली जात असल्याने बोगस डॉक्टर बिनधास्तपणे व्यवसाय करत आहेत. नवी मुंबईकरांचे आरोग्य बोगस डॉक्टरांच्या विळख्यात सापडून अनेक वुÀटुंबेे उध्वस्त होण्याचे संकट टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने दिघा ते बेलापूर पर्यंत कार्यरत असणाऱ्या सर्वच दवाखाने आणि रुग्णालयांची झाडाझडती घ्ोवून बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम उघडण्याचे आदेश देण्याची मागणी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.