चोरीची वीज वापर आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई

तुर्भे येथे ६.२९ लाखांची वीज चोरी उघड 

नवी मुंबई ः ‘महावितरण'च्या भांडूप परिमंडलात वीजचोरी पकडण्याची मोहिम सातत्याने सुरु आहे. याअंतर्गत तुर्भे, सेवटर-२२ मध्ये राबविलेल्या मोहिमेत एकूण ६.२९ लाखांची वीजचोरी उघडकीस आली आहे. ‘महावितरण'च्या तुर्भे मॅफको शाखा अंतर्गत वीजचोरी करणाऱ्यांवर छापे टाकून नुकतीच कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८ जणांवर वीजचोरीची कारवाई करण्यात आली. त्यापैकी वीज अधिनियम २००३ कलम १३५ अन्वये सदर सात वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी चार ग्राहकांनी वीज चोरीचे ६ लाख २९ हजार ५१०रुपये दंडाचे देयक भरले. तर उर्वरित तीन ग्राहकांविरुध्द कार्यवाहीची प्रक्रिया सुरु आहे. तसेच वीज अधिनियम २००३ कलम  १२६ अन्वये एका ग्राहकांवर कार्यवाही करण्यात आली.

सदर वीजचोरी शोध मोहिमेत ‘महावितरण'चे वाशी मंडळ अधीक्षक अभियंता राजाराम माने आणि कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे तसेच रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता संजय मुंढे, पवन राऊत, सचिन फुलझले, जयेश गायकर, श्रध्दा भोजकर तसेच कर्मचारी निकिता आगरकर, विशाल गिरी, विशाल चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली. ग्राहकांनी अधिकृतपणे वीज वापर करावे. वापरलेल्या विजेचे बिल नियमितपणे भरावे. चोरीची वीज वापर आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. -धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता-भांडूप परिमंडल-महावितरण.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

किरकोळ कारणावरुन दोन्ही वाहन चालकांच्या कुटुंबियांमध्ये हाणामारी