पाम बीच मार्गावरील एका व्यापारी संकुलाच्या टेरेसवर अनधिकृत बार अँड रेस्टॉरट्स

अनधिकृत बार आणि रेस्टॉरंटला कुणाचा आशीर्वाद?

नवी मुंबई -: पाम बीच मार्गावरील  सेक्टर १९ येथील एका व्यापारी संकुलाच्या टेरेसवर अनधिकृत बार अँड रेस्टॉरट्स सुरू आहे. सदर बारला तुर्भे मनपा विभागाने एमआरटीपी खाली नोटीस बजावली असून या नोटीसचा कालावधी संपलातरी देखील यावर अजून कारवाई न केल्याने सदर बार ला कुणाचा आशीर्वाद आहे ?असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई शहरात मनपा  अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचे प्रकार सुरू असताना आता अनधिकृत.बार आणि रेस्टॉरंट ला पद्धतशीर अभय देण्याचे प्रकार सुरू असल्याचा प्रत्यय वाशी एपीएमसी  भागात येत आहे.येथील सेक्टर.१९ येथील एका व्यापारी संकुलाच्या टेरेसवर मनपाच्या परवानगी विना  मागील चार महिन्यांपासून नाईन स्टोन बार अँड  रेस्टॉरट्स नावाने  हॉटेल सुरू आहे.त्यामुळे सदर बार वर कारवाई करण्यासाठी तक्रार  झाल्यानंतर मनपा  तुर्भे विभागाने या हॉटेल मालकाने टेरेस वर एक किचन एक बाथरूम बांधले आहे म्हणून एम आर टी पी खाली ३२ दिवसांची नोटीस.बजावली आहे.मात्र सदर नोटोसीचा कालावधी संपला तरी देखील देखील यावर अजून कारवाई न केल्याने सदर बार ला कुणाचा आशीर्वाद आहे ?असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाशी सेक्टर १९ येथील एका व्यापारी संकुलाच्या टेरेसवर अनधिकृत बार अँड रेस्टॉरट्स सुरू आहे म्हणून मनपा तुर्भे.विभागाने एम आर टी पी ची नोटीस बजावली आहे. मात्र सदर नोटीस असून देखील परवाना विभागाने जुन्या अग्निशमन दलाच्या ना हरकत प्रमाणपत्राच्या आधारे व्यवसाय परवाना देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे मनपाचा एक विभाग सदर हॉटेल अनधिकृत असल्याचे जाहीर करतो तर दुसरा विभाग इतर परवानगी देण्याची तयारी करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर यात टेरेसवर तीन वर्षापूर्वी अनधिकृत हुक्का पार्लर चालवले जात असल्याबाबत तोडक कारवाई केली होती. त्यामुळे मनपा दप्तरी सर्व नोंद असून देखील पुन्हा त्याच ठिकाणी हॉटेल चालवले जात असल्याने भविष्यात परेल मधील वन अबोव सारखी दुर्घटना घडली तर त्याची विद्यमान अधिकारी जबाबदारी घेतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

चोरीची वीज वापर आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई