जेएनपीटी बंदरातून निर्यात झालेला व दुबईतून परत मागवलेल्या कंटेनरमध्ये सापडले अडीच कोटींचे रक्तचंदन

नवी मुंबई : सीमा शुल्क विभागाने जेएनपीटी बंदरातून दुबई येथे निर्यात करण्यात आलेला संशयित कंटेनर पुन्हा मागवून त्यातून तस्करी करण्यात आलेला अडीच कोटीं रुपये किमतीचा तीन मेट्रीक टन रक्तचंदनचा साठा जप्त केला आहे. जेएनपीटी बंदरातून रक्त चंदनाच्या तस्करीची मागील 15 दिवसातील हि दुसरी घटना आहे.


जेएनपीटी बंदरातून काही दिवसापूर्वी दुबई येथील जेबेल अली बंदरात एक कंटेनर निर्यात करण्यात आला होता. सदर कंटेनर मधील मालाबाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे सीमा शुल्क विभागाने सदर कंटेनर परत मागविला होता. दुबईतून परत मागविण्यात आलेल्या सदर कंटेनरची तपासणी करण्यात आली असता, त्यात सुमारे अडीच कोटीं रुपये किमतीचे ३ मेट्रिक टन रक्तचंदन आढळुन आले. त्यानंतर सीमा शुल्क विभागाने सदर रक्तचंदनाचा साठा जप्त करून सदर रक्तचंदनची जेएनपीटी बंदरातून निर्यात करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, गत आठवड्यात जेएनपीटी बंदरातून परदेशात पाठविला जाणारा रक्त चंदनाचा कंटनेर पकडण्याची कारवाई डीआरआय विभागाने केली होती. या कारवाईत अडीच कोटी रुपये किंमतीचा 3030 किलो रक्त चंदनाचा साठा जप्त करण्यात आला होता. विशेष म्हणजे तार खिळे असल्याचे भासवून सदर रक्तचंदनची तस्करी करण्यात येत असल्याचे तपासणीत आढळुन आले होते. त्यानंतर सीमा शुल्क विभागाने हि कारवाई केली आहे


 

 
Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन महिलांची तुंबळ हाणामारी