रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या 9 टंकी हुक्का पार्लरवर छापा

 

सानपाड्यातील 9 टंकी हुक्का पार्लरवर कारवाई

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर-31ए मधील मेरेडीअन सेंटर इमारतीतील 14 व्या मजल्यावर रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या 9 टंकी हुक्का पार्लरवर हुक्का पार्लरवर अनितिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गत मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास छापा मारुन सदर हुक्का पार्लरमध्ये हुक्का ओढण्यासाठी बसलेले 10 ग्राहक तसेच हुक्का पार्लरचा मॅनेजर, वेटर व इतर 7 जण अशा एकुण 17 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ जप्त करुन सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

सानपाडा सेक्टर-31ए मधील मेरेडीअन सेंटर इमारतीतील 14 व्या मजल्यावर बेकायदेशीररीत्या 9 टंकी हुक्का पार्लर सुरू असल्याची तसेच सदर ठिकाणी हुक्क्यामध्ये निकोटियन आणि तंबाखूजन्य पदार्थाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी सदर हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश  दिले होते. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास सानपाडा रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या 9 टंकी हुक्का पार्लरवर छापा मारला. 

यावेळी सादर हुक्का पार्लरमध्ये 10 ग्राहक हुक्का ओढत बसल्याचे तसेच त्याठिकाणी तंबाखुजन्य पदार्थाचा धुरकट वास व धुर पसरल्याचे आढळुन आले. सदर हुक्का पार्लरमध्ये बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर सुरु असल्याचे आढळून आल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सदर हुक्का पार्लरचा मॅनेजर व वेटर  यांच्यासह हुक्का ओढण्यासाठी बसलेले ग्राहक अशा एकुण 17 जणांविरोधात सिगारेट व तंबाखुजन्य उत्पादने अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन करुन सर्वांना ताब्यात घेतले आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पनवेल मधील पोयंजे गावातील 80 वर्षीय वृद्धाची हत्या