पीडित मुलीचे नाव व तिची ओळख उघड करून या सर्वांनी कायद्याचा भंग

सीवूड्स आश्रमशाळा लैंगीक शोषण प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल   

नवी मुंबई : सीवूड्स येथील आश्रमशाळा लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित मुलींचा लैंगिक छळ झाला नसल्याचे सांगण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आश्रमशाळा व आरोपी राजकुमार येसुदासंन याचा बचाव करणारे समर्थक आता चांगलेच गोत्यात आले आहेत. पॉक्सोच्या गुह्यातील पीडित मुलीचे नाव उघड करण्यास कायद्याने बंदी असताना, या समर्थकांनी आश्रमशाळा व त्यातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणारा पास्टर राजकुमार येसुदासन याच्या समर्थनार्थ जाहीर पत्रकार परिषद घेऊन त्यात पीडित मुलीचे नाव उघड केले. त्यामुळे एनआरआर पोलिसांनी पत्रकार परिषद घेणाऱया चौघा समर्थकाविरोधात अपहरण आणि पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता पाच गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणात अटकेत असलेल्या पास्टरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 

सिवूड्स येथील चर्चमध्ये सुरू असलेल्या आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलींचा तेथील पास्टर कडून लैंगिक शोषण होत असल्याची बाब उघडकिस आल्यानंतर ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाने येथील पास्टर विरोधात एन.आर.आय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पास्टर राजकुमार येसुदासान याच्या विरोधात विनयभंग व पॉक्सो नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. 

मात्र त्यानंतर चर्च व आरोपी राजकुमार येशुदासन याच्या बचावासाठी पुढे आलेल्या  एआरके फाऊंडेशन या संस्थेने गत महिन्यात जुईनगर येथे जाहीर पत्रकार परिषद घेऊन सदर संस्थेमध्ये कोणत्याही मुलीवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे सांगत ठाणे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाने पोलिसांकडे खोटी तक्रार  दाखल केल्याचां आरोप केला होता. तसेच आरोपी राजकुमार येशुदासान याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.  

त्यावेळी या समर्थकांनी सदर प्रकरणातील पीडित मुलगी व तिची आई या दोघांना प्रसारमाध्यमांसमोर आणून त्यांना महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या कारवाई विरोधात बोलण्यास भाग पडले होते. या पत्रकार परिषदेत पीडित मुलीचे नाव व तिची ओळख उघड करून या सर्वांनी कायद्याचा भंग केल्याचे आढळुन आले.  

या प्रकाराची न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यानंतर एनआरआय पोलिसांनी या प्रकरणात स्वत फिर्यादी होऊन पत्रकार परिषद घेणाऱया महेंद्र आनंदा कांबळे (४५), वकील अनिल बुगदे (६०), आरोपी राजकुमार याची पत्नी जिना राजकुमार येसुदासान (४५) आणि पीडित मुलीची आई या चौघाविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात अपहरण आणि पॉक्सो कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

तुर्भे गावात सुरूअसलेल्या अनधिकृत गॅरेजवर कारवाईची रहिवाशांची मागणी