कंपनी मालकांना आणि गोदाम मालकांना भीती घालून राजरोस वसुली

माथाडी कामगार संघटनांच्या नावाने वसुली करणाऱ्या नेत्यांवर कारवाईचे संकेत

नवी मुंबई :- एपीएमसी कांदा बटाटा मार्केट येथे नुकताच माथाडी कामगार मेळावा घेण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडींच्या नावाने वसुली करणाऱ्या बोगस नेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी ,माथाडी कायद्याचा दुरुपयोग करून कंपनी मालकांना आणि गोदाम मालकांना भीती घालून राजरोस वसुली केली जात असल्याची तक्रार केली होती . हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत . मात्र प्रत्यक्षात भाजप व  शिंदे गटातील शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या अनेक नेत्यांच्या माथाडी संघटना यामध्ये आघाडीवर असल्याने कारवाईचा नावाने फुसका बार तर ठरणार नाही अशी भीती माथाडी कामगार व्यक्त करत आहेत .

    माथाडी सरंक्षण कायदा अंमलात आल्यापासून कामाच्या ठिकाणी माथाडी कामगारांना संरक्षण मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे ,मात्र या कायद्याचा गैरफायदा माथाडी कामगार संघटना नोंदणीकृत करून बोगस माथाडी कामगार नेते अधिक घेताना दिसून येत आहेत . या माथाडी कामगार संघटनांना बाकडा युनियन असा उपरोधिक शब्द वापरला जातो. पुण्यातील काही कथित नेते आघाडीवर असून या नेत्यांनी संघटनांच्या नावाने प्रत्येक परिसरात आपले पदाधिकारी नेमले आहेत . औद्योगिक परिसरात मालवाहू गाड्या रोखून कायद्याने मालाची चढ उतार करण्यास माथाडी कामगार नसतील तर हे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते कंपनी मालकांना कारवाईची भीती दाखवतात . भयभीत कंपनी मालक माथाडी संघटनांचा पिच्छा सोडवण्यासाठी या कामगार नेत्यांशी जुळवून घेतात. माथाडी कामगारांची नोंदलेली टोळी दाखवून मग माथाडी कामगाराच्या शिवाय स्वस्तातील मजुरांकडून हमालीची काम उरकून घेतली जातात . या मोबदल्यात कथित माथाडी कामगार नेत्यांना बिदागी द्यावी लागते . याविरोधात अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेच्या नरेंद्र पाटील यांनी तक्रार केली , या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश जाहीररीत्या देण्यात आले आहेत . मात्र या कथित नेत्यांनी आधीच भाजपात प्रवेश करून राजकीय सरंक्षण घेऊन ठेवले असल्याने पोलीस किती सक्षम कारवाई करतील याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. नवी मुंबई शहरात औद्योगिक परिसरात कळंबोली स्टील बाजार एपीएमसी रेल्वे यार्ड आवारात मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार कार्यरत आहेत . या माथाडी कामगारांची नोंदणी तत्सम बोर्डात केली जाते . नवी मुंबई शशिकांत शिंदे नरेंद्र पाटील यांच्यानंतर रामिष्टे गट पवार गट अश्या तीन मोठ्या संघटना कार्यरत असून भाजपने आता माथाडी कामगार संघटना स्थापन केली आहे . शिवसेनेच्या नेत्यांनी देखील माथाडी कामगार संघटना स्थापन केली असून मनसे प्रणित माथाडी कामगार संघटना देखील कार्यरत आहेत . विविध राजकीय पक्षांच्या बरोबर राजकीय नेत्यांनी स्वतःच्या माथाडी कामगार संघटना स्थापन केल्या आहेत. याच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या जीवावर कंपनी मालकांना भीती घातली जात असल्याने या कथित माथाडी कामगार नेत्यांवर कारवाई खरच होणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे .

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

आरोपी कुंदन भंडारीचा जामीन फेटाळला ; अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण