तळवलीत 6 लाख 40 हजार रुपये किंमतीचे बँकेच्या सिक्युरीटी लॉकर्सची चोरी  

नवी मुंबई : घणसोली तळवली भागातील एका गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेले सुमारे 6 लाख 40 हजार रुपये किंमतीचे बँकेच्या सिक्युरीटी लॉकर्सचे 2650पितळी लॉक तसेच 40 लॉकरचे दरवाजे अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकरणातील चोरटया विरोधात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.  

या घटेनतील तक्रारदार नंदु जाधव हे ठाण्यात राहण्यास असून त्यांचा बँकेला सिक्युरीटी लॉकर्स पुरविण्याचा तसेच सर्व्हीसेस करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे गोडाऊन घणसोली सेक्टर-5 मधील तळवली येथील मनिशा पॅलेस को.ऑप सोसायटीत आहे. या गोडाऊनमध्ये नंदु जाधव यांनी दोन बँकेच्या सिक्युरीटी लॉकर्सचे 2650पितळी लॉक व लॉकरचे लहान मोठे 40 लोखंडी दरवाजे ठेवले होते. त्यानंतर जाधव हे गणेशोत्सवानिमीत्त आपल्या गावी निघुन गेले. तेथून ते 14 सफ्टेंबर रोजी परतल्यानंतर त्यांच्या गोडाऊनमधील सर्व पितळी  लॉक आणि लॉकरचे लोखंडी दरवाजे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर नंदू जाधव यांनी सीसीटीव्ही कॅमे-याची पडताळणी केली असता, त्यांचे सामान उतरविण्यासाठी आलेल्या हमालाने सदर गोडाऊनचे शटर उघडून त्यातील 6 लाख 40 हजार रुपये किंमतीचे पितळी लॉक आणि लोखंडी दरवाजे चोरुन नेल्याचे आढळुन आले. त्यानंतर त्याने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कंपनी मालकांना आणि गोदाम मालकांना भीती घालून राजरोस वसुली