१५.९९ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडीटचा घोटाळा उघडकीस

महाराष्ट्र जीएसटी विभागाने १६ कोटी रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा केला उघड, पुणे येथील व्यावसायीकाला अटक  

नवी मुंबई : प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारच्या खरेदी विक्रीचा व्यवहार न करता तब्बल ८८. ८४ कोटींच्या बनावट खरेदी विक्रीच्या बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविणाऱया पुण्यातील मे.सनराईज टूर्स ऍण्ड ट्रव्हल्स आणि सनराईज केमिकल्स या कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाने छापा मारुन १५.९९ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडीटचा घोटाळा उघडकीस आणला आहे. या कारवाईनंतर महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अन्वेषण विभागाने अधिक तपास करत सदर कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अन्वेषण विभागाच्या वतीने या आर्थिक वर्षात आतापर्यंत अशाच प्रकारच्या कारवाया करुन ४३ जणांना अटक करण्यात आली आहे.  

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण पथकाकडुन बोगस बिलासंदर्भात विशेष तपासणी मोहीम सुरु असताना पुण्यातील मे.सनराईज टूर्स ऍण्ड ट्रव्हल्स, सनराईज मिल मेल, सनराईज केमिकल्स या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे जीएसटी अन्वेषण विभागाकडुन या कंपनीच्या बोगस बिलासंदर्भात तसेच करचोरी विरोधात विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. या तपासणीत सदर कंपनीकडुन प्रत्यक्षात खरेदी विक्रीचा व्यवहार झाला नसल्याचे आढळुन आले. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण पथकाने याबाबत केलेल्या सखोल तपासणीत सदर कंपनीने ८८. ८४ कोटीपेक्षा अधिकच्या खोटÎा खरेदी देयकांद्वारे १५.९९ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविल्याचे आढळुन आले.  

त्यानंतर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाने मे.सनराईज टूर्स ऍण्ड ट्रव्हल्स, सनराईज मिल मेल, सनराईज केमिकल्स या कंपनीचे मालक हिरेन परेश पारेख यांना २३ सफ्टेंबर रोजी अटक केली. पारेख याला पुणे येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई पुणे राज्यकर सहआयुक्त  दिपक भंडारे, राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त श्रीकांत खाडे, ऋषीकेश अहिवळे, प्रदीप कुलकर्णी व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांच्या पथकाने पार पाडली.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

तळवलीत 6 लाख 40 हजार रुपये किंमतीचे बँकेच्या सिक्युरीटी लॉकर्सची चोरी