गल्लोगल्ली खिडकीत हात घालुन मोबाईल फोन व इतर किंमती वस्तु चोरणारा चोरटा अटक

नग्नावस्थेत फिरून चोऱ्या करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात  

नवी मुंबई : दिघा परिसरात रात्री अपरात्री अर्ध नग्नावस्थेत फिरुन चोऱया करणाऱया एका सराईत चोरटयाला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी कळवा येथून ताब्यात घेतले आहे. दिघा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास फक्त चड्डीवर वावरणाऱ्या या चोरटयाचा सीसीटीव्ही फुटेज काही दिवसांपुर्वी सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.  

रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी हा कळवा भागात राहण्यास असून गत आठवडयात तो दिघा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करण्यासाठी अर्धनग्न अवस्थेत फिरत होता. त्यावेळी तो एका सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. सीसीटीव्ही कॅमे-यातील अर्धनग्न अवस्थेतील चोरटयाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या चोरटयाचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन त्याची ओळख पटविली असता, तो कळवा भागात राहण्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बुधवारी कळवा येथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याच्यावर यापुर्वी चोरीचे 8 ते 9 गुन्हे दाखल असल्याचे आढळुन आले आहे.  

रात्री अपरात्री गल्लो गल्ली फिरुन घराच्या खिडकीत हात घालुन मोबाईल फोन व इतर किंमती वस्तु चोरण्यात हा चोरटा पटाईत आहे. आपल्याला कुणी पकडु नये यासाठी तो रात्री चोरी करताना नग्नावस्थेत फिरत असल्याचे त्याच्या चौकशीत आढळुन आले आहे. हा आरोपी आजारी असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची तब्येत सुधारल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधिर पाटील यांनी दिली.

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

सिडको कार्यालयात अधीक्षक अभियंता व सेवानिवृत्त सहा. कार्यकारी अभियंता लाच घेताना रंगेहात पकडले