अफगाणिस्तानातून अंमली पदार्थाची तस्करी 

नवी मुंबईत कंटेनरमधून 1725 कोटींचे हेरॉईन जफ्त  

नवी मुंबई : अफगाणिस्तान येथून ज्येष्ठमधाच्या (मुलेटी) मुळामध्ये लपवुन आणण्यात आलेले सुमारे दिड हजार कोटी रुपये किंमतीचे हेरॉईन हे अंमली पदार्थ कंटनेरसह जफ्त करण्याची कारवाई दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकतीच केली आहे. मागील दिड वर्षापासुन हा कंटनेर पनवेलमधील आष्टे लॉजीस्टीक्स येथे डीआरआयने जफ्त करुन ठेवला होता. विशेष म्हणजे गत 6 ऑगस्ट रोजी दुबईहून न्हावा-शेवा बंदरात आलेल्या कंटेनरच्या चौकटीत लपवुन आणण्यात आलेले 362 कोटी रुपये किंमतीचे हेरॉईन नामक  अंमली पदार्थ नवी मुंबई पोलिसांनी पकडले हेते. परदेशातून न्हावाशेवा बंदरमार्गे येणाऱया कंटेनरमधून वेगवेगळ्या पद्धतीने मोठÎा प्रमाणात अंमली पदार्थ तस्करी करुन आणण्यात येत असल्याचे या प्रकारावरुन दिसून येत आहे. 

दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लखनौ आणि दिल्लीमध्ये कारवाई करुन दोन अफगाणी तस्करांना अटक केली होती. या तस्करांकडून 312 किलो मेफाफेटामाईन नावाचे मादक पदार्थ आणि 10 किलो हेरॉईन जफ्त करण्यात आले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून अफगाणीस्तानमधून न्हावाशेवा बंदरात दीड वर्षापूर्वी आलेल्या एका कंटेनरमध्ये अंमली पदार्थ असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेलचे पथक गत 16 सफ्टेंबर रोजी नवी मुंबईत दाखल झाले होते.  

दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाकडून कंटेनरची तपासणी करण्याचे सर्च वॉरंट सोबत आणल्याने दिल्ली पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने पनवेल मधील आष्टे लॉजिस्टक्समध्ये मागील दिड वर्षापासून ठेवण्यात आलेल्या संशयित 40 फुटी कंटेनरची डी.आर.आय, कस्टम, तसेच स्थानिक पोलिसांसमोर तपासणी केली. यावेळी सदर कंटेनरमध्ये ज्येष्ठमधाच्या (मुलेटी) 4 ते 6 इंच मुळ्यांमध्ये (लिकोराईस रुट) हेरॉईन हे अंमली पदार्थ आढळुन आले.  

त्यामुळे दिल्ली पोलिसांनी सदरचे अंमली पदार्थयुक्त ज्येष्ठमधाच्या मुळ्यांसह  कंटेनर  जफ्त करुन पुढील तपासासाठी दिल्ली येथे नेला आहे. सुमारे 350 किलो वजनाच्या ज्येष्ठमधाच्या हेरॉईनयुक्त मुळ्या या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 1 हजार 725 कोटी रुपये मुल्य असल्याचे बोलले जात आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांनी सर्वोतोपरी मदत केल्याची माहिती नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.  

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी जफ्त केलेला कंटेनर अफगाणिस्तान येथून पाकिस्तानातील निमरज बॉर्डर व्हाया इराण मधील शाहिद रजाई पोर्ट मार्गे न्हावाशेवा बंदरात आला होता. मध्यप्रदेश येथील संधु एक्सपोर्टसने हा कंटेनर मागविल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरुन आढळुन आले आहे. इराण मधील शाहिद रजाई पोर्ट येथून सदर कंटेनर लोड होऊन 13 जून 2021 रोजी न्हावा शेवा बंदरात दाखल झाला होता. त्यावेळी डीआरआयच्या अधिकाऱयांनी या कंटेनरची तपासणी केली होती. मात्र सदर कंटेनर संदर्भात संशय  असल्याने डीआरआयच्या अधिकाऱयांनी सदर कंटेनर जफ्त करुन पनवेल तालुक्यातील आष्टे लॉजिस्टीक्समध्ये ठेवला होता. 

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

गुटख्याचा साठा बाळगणा-या व्यक्तीला अटक