तार खिळे असल्याचे भासवून रक्त चंदनाची होणार होती तस्करी  

 

नवी मुंबई : तार खिळे असल्याचे भासवून जेएनपीटी बंदरातून परदेशात पाठविला जाणारा रक्त चंदनाचा कंटनेर पकडण्याची कारवाई कस्टमच्या डीआरआय विभागाने गत शनिवारी केली. या कारवाईत पकडण्यात आलेल्या कंटेनरमध्ये तब्बल अडीच कोटी रुपये किंमतीचे 3030 किलो रक्त चंदनाचा साठा सापडला असून सदरचे रक्त चंदने डीआरआयने जप्त केले आहे. सदर रक्त चंदनाची तस्करी करणाऱयांचा आता कस्टम व डीआरआय विभागाकडुन शोध घेण्यात येत आहे.  

 जेएनपीटी बंदरातुन एका कंटेनरमधुन रक्तचंदन तस्करी करुन परदेशात पाठविण्यात येत असल्याची माहिती कस्टमच्या डीआरआय विभागाला मिळाली होती. त्यानुसार गत 17 सफ्टेंबर रोजी डीआरआयच्या पथकाने जेएनपीटीत आलेल्या संशयीत कंटेनरचा शोध घेऊन त्याची तपासणी केली. यावेळी सदर कंटेनमध्ये 3030 किलो रक्तचंदनाचा साठा आढळुन आला असून तीन पार्सलमध्ये हा रक्तचंदनाचा साठा कंटेनरमध्ये लपवुन ठेवण्यात आल्याचे आढळुन आले. तसेच सदर कंटेनरमध्ये तार-खिळे असल्याचे भासवून सदर रक्तचंदनाचा साठा परदेशात पाठविण्यात येत असल्याचे आढळुन आले. मात्र डीआरआयच्या पथकाने वेळीच कारवाई केल्यामुळे चंदन तस्करांचा डाव फसला आहे. या कारवाईत पकडण्यात आलेले रक्त चंदन तब्बल अडीच कोटी रुपये किंमतीचे आहे.  

यापुर्वी जेएनपीटी बंदरातून मोठया प्रमाणात चंदनाची तस्करी होत होती. त्यावेळी कस्टम विभागाने अनेकवेळा चंदनाची तस्करी पकडली आहे. कस्टम विभागाने त्यावेळी काही तस्करांच्या साथीदारांनी अटक देखील केली होती. मात्र रक्तचंदनाची तस्करी करणारे मुख्य तस्कर अद्यापपर्यंत कस्टम अथवा डीआरआयच्या हाती लागलेले नाहीत.  

 

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

अफगाणिस्तानातून अंमली पदार्थाची तस्करी